प्रभू श्रीराम भारतीय नव्हे तर नेपाळी होते- के.पी.ओली

खरी अयोध्या ही भारतात नव्हे तर नेपाळमध्ये; ओलींचा दावा

Updated: Jul 13, 2020, 09:26 PM IST
प्रभू श्रीराम भारतीय नव्हे तर नेपाळी होते- के.पी.ओली
संग्रहित फोटो

काठमांडू : नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली सतत भारतावर निशाणा साधत आहेत. सोमवारी ओली यांनी, सांस्कृतिक अतिक्रमणासाठी भारताने बनावट अयोध्या तयार केली असल्याचा दावा केला आहे. अयोध्या भारतात नसून नेपाळमध्ये आहे. प्रभू श्रीराम भारतीय नाही तर नेपाळी असल्याचं ते म्हणाले आहेत.

यापूर्वी ओली यांनी, भारत त्यांना सत्तेवरुन दूर करण्यासाठी कट रचत असल्याचंही म्हटलं होतं. 

कवी भानुभक्त आचार्य यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात त्यांनी, नेपाळवर सांस्कृतिकदृष्ट्या अत्याचार केला गेल्याचं म्हटलं आहे. 

याआधी, कोरोनावरुनही त्यांनी, भारतातून येणारं कोरोना व्हायरसचं संक्रमण हे चीन आणि इटलीतून येणाऱ्या संक्रमणापेक्षा अधिक घातक असल्याचा, दावा केला होता.

चीनपेक्षा भारतातून येणारा कोरोना घातक 'या' देशाच्या पंतप्रधानांचा दावा