आई शप्पथ! भरदिवसा चोराचा धुमाकूळ, 1.45 कोटी लंपास

एका खासगी कंपनीचे कर्मचारी बुधवारी ही रक्कम ट्रकमधून उतरवत होते. त्याचवेळी चोरांनी संधी साधली.

Updated: Jan 23, 2021, 07:32 PM IST
आई शप्पथ! भरदिवसा चोराचा धुमाकूळ, 1.45 कोटी लंपास

न्यूयॉर्क : आतापर्यंत काही लाख रुपयांच्या बॅग अफरातफर करून लंपास केल्याचे अनेक सीन सिनेमामध्ये पाहिले असतील. मात्र एका चोरानं तर धुमाकूळच घातला आहे. भरदिवसा चोरानं लाखो नाही तर 1.45 कोटी रुपयांवर डल्ला मारला आहे. विश्वास बसणं थोडं कठीण आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालत आहे.

अमेरिकेच्या न्यूयॉर्क परिसारत एक चोर 200,000 डॉलर्स चोरून पळताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याची साधारण रुपयात किंमत 1.45 कोटी रुपये एवढी आहे. भरदिवसा एवढ्या मोठ्या रकमेची चोरी झाल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली. इतकच नाही तर सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह युझर्सकडून उपस्थित केला जात आहे. 

न्यूयॉर्क पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार एका खासगी कंपनीचे कर्मचारी बुधवारी ही रक्कम ट्रकमधून उतरवत होते. त्याचवेळी चोरांनी संधी साधली. ही रक्कम बँकेत घेऊन जात असताना चोराने त्यावर डल्ला मारला. कर्मचाऱ्याला जोरात धक्का मारून त्याने त्याच्या हातातील साधारण 1.45 कोटींची रक्कम पळवली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर सीसीटीव्ही व्हिडीओच्या मदतीनं चोराचा तपास सुरू आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.