मुंबई : आज आकाशात मंगळ ग्रहाला अधिक जवळून पाहता येणार आहे. मंगळवारी म्हणजेच 31 जुलैला मंगळ ग्रह 15 वर्षानंतर पृथ्वीच्या खूप जवळ येणार आहे. या दरम्यान मंगळ ग्रह पृथ्वीच्या खूप जवळ येणार आहे. याआधी ही घटना 2003 मध्ये घडली होती.
या दरम्यान मंगळ ग्रह खूप मोठा दिसणार आहे. पृथ्वीच्या जवळ असल्याने मंगळ ग्रह ज्युपिटर पेक्षा अधिक चमकतांना दिसणार आहे. सूर्यमालेत शुक्र ग्रह हा दुसरा सगळ्यात चमकणारा ग्रह आहे. पृथ्वीपासून जवळ आल्यामुळे 7 जुलै ते 7 सप्टेंबर पर्यंत मंगळ पृथ्वी भोवती असणार आहे. उघड्या डोळ्यांनी देखील त्याला पाहिसं जावू शकतं.
मंगळ ग्रह पृथ्वीच्या आकाराच्या अर्धा आहे. पृथ्वीवरुन पाहिल्यानंतर तो खूप लहान दिसतो. पण पृथ्वीच्या जवळ असल्याने मंगळ ग्रह खूप मोठा दिसणार आहे. नासाच्या माहितीनुसार 2020 मध्ये मंगळ ग्रह पृथ्वीच्या पुन्हा जवळ येणार आहे. तेव्हा दोघांमधील अंतर 6.2 कोटी किलोमीटर असेल.