Rs 16000 Crore Company Sold For Rs 74: हजारो कोटी रुपयांची संपत्ती असलेला एखादा श्रीमंत व्यक्ती एका रात्रीत रस्त्यावर आला असं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच हे असं घडणं शक्यच नाही असं वाटू शकतं. किंवा या असल्या गोष्टी केवळ चित्रपटांमध्ये दाखवल्या जातात खऱ्या आयुष्यात असलं काही घडत नाही असंही अनेकजण म्हणतील. मात्र खरोखरच असा प्रकार घडला आहे आणि तो सुद्धा भारतीय उद्योजकाबरोबर.
या दुर्देवी उद्योजकाचं नाव आहे बी. आर. शेट्टी म्हणजेच बवागुत्थु रघुराम शेट्टी. शेट्टी यांची एकूण संपत्ती 18 हजार कोटी रुपये इतकी होती. जगप्रसिद्ध असा बुर्ज खलीफा इमारतीमधील 2 संपूर्ण मजले त्यांच्या मालकीचे होते. या मजल्यांची किंमत 2.5 कोटी डॉलर्स इतकी होती. खासगी जेट विमान, लक्झरी कार आणि पाम जुमैरा या बेटासारख्या कृत्रीम भूभागावरील पामा जुमैरा येथे बंगला अशी त्यांची संपत्ती होती. मात्र एका ट्वीटमुळे त्यांच्या या सगळ्या संपत्तीची राख झाली.
ज्या पद्धतीने हिंडनबर्ग प्रकरणाचा अदानी समुहाला फटका बसला त्याहून मोठा फटका बीआर शेट्टी यांना बसला आहे. त्यांना आपली 2 अब्ज डॉलर्सची म्हणजेच 16 हजार 650 कोटी रुपयांची कंपनी अवघ्या 1 डॉलरला म्हणजेच 74 रुपयांना विकावी लागली.
बीआर शेट्टी यांच्याकडे जगातील सर्वात प्रसिद्ध बुर्ज खलिफा इमारतीमधील 2 मजल्यांची मालकी होती. या ठिकाणी आलिशान पार्ट्यांचं आयोजन केलं जायचं. ते खासगी जेटने दुबईला ये-जा करायचे. त्यांच्याकडे रॉल्स रॉयस, मेबॅक सारख्या आलिशान गाड्या होत्या. त्यांना व्हिंजेट कार्सचीही फार आवड होती. त्यांच्या कार्सच्या ताफ्यामध्ये मॉरिस माइनर 1000 चाही समावेस होता. शेट्टींकडे पाम जुमैरा आणि दुबई वर्ल्ड सेंटरमधील एक प्रॉपर्टीही होती. त्यांच्याकडे एका खासगी जेटची 50 टक्के मालकी होती. त्यांनी ही मालकी 42 लाख डॉलर्सला विकत घेतली होती.
2019 मध्ये युनायटेड किंग्डममधील 'मडी वॉटर्स'ने त्यांच्या कंपनीसंदर्भात एक ट्वीट केलं. यानंतर 4 महिन्यांनी कंपनीने एक अहवाल प्रसिद्ध केला. ज्यामध्ये एनएमसी हेल्थ कंपनीमध्ये आर्थिक फेरफार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. कंपनीवरील कर्ज हे दाखवल्या जात असलेल्या कर्जापेक्षा जास्त असून कंपनी त्यांचे आर्थिक व्यवहारही आहेत त्यापेक्षा वाढवून चढवून सांगत असल्याचा दावा करण्यात आला. बी. आर. शेट्टी याच एनएमसी हेल्थचे मालक होते. संयुक्त अरब अमिरातीमधील ही सर्वात मोठी खासगी आरोग्य सेवा पुरवणारी कंपनी होती. ही कंपनी लंडन स्टॉक एक्सचेंजमधील लिस्टेड कंपनी होती. शेट्टी यांच्या दुर्देवाने या कंपनीवर 'मडी वॉटर्स'ची वक्रवृष्टी पडली.
एनएमसी हेल्थने बरेच आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात तिचे शेअर्स गुंतवणूकदार विकू लागले. पाहता पाहता शेट्टी कुटुंबियांच्या संपत्तीमध्ये 1.5 अब्ज डॉलर्सची घसरण झाली. 'मडी वॉटर्स' ही कंपनी 'हिंडनबर्ग'प्रमाणे शॉर्ट सेलर कंपनी आहे.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
LES
(20 ov) 81/8
|
VS |
BOT
83/4(12.3 ov)
|
| Botswana beat Lesotho by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
MAS
(19 ov) 131/7
|
VS |
BRN
135/3(17.1 ov)
|
| Bahrain beat Malaysia by 7 wickets (DLS method) | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.