मुंबई : अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल आबोमा आता एक नवं काम सुरू केलं आहे. ओबामा आणि मिशेल यांनी नेटफ्लिक्ससोबत करार केला असून आता ते टीव्ही शो आणि सिनेमे प्रोड्यूस करणार आहेत. नेटफ्लिक्सद्वारे यांची घोषणा सोमवारी केली आहे. मल्टी ईअरच्या करारांतर्गत ओबामा आणि मिशेल स्क्रिप्ट आणि अनस्क्रिप्टेड सीरीजमध्ये काम करणार आहे. ते दोघेही डॉक्युमेंट्री आणि फिचर्स सिनेमांची निर्मिती करणार आङे. बराक ओबामा यांनी सांगितले आहे की, माझ्यासाठी ही आनंदाची बाब आहे.
तसेच बराक ओबामाने सांगितलं की, पब्लिक सर्व्हिसमधील ही बाब आमच्यासाठी अत्यंत आनंदाची आहे. या कामाच्या मार्फत आम्ही अनेक लोकांना भेटू ज्यांनी आपल्या आयुष्यात खूप काही पाहिलं आहे. ज्यांनी एक वेगळीच गोष्ट असेल. त्यांची गोष्ट अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यात आम्ही मदत करू. तर मिशेल ओबामा म्हणाल्या की, आम्ही दोघं ही गोष्ट ऐकण्यावर विश्वास ठेवतो. या गोष्टीमुळे प्रेरणा मिळते. यामुळे विचार करण्याची क्षमता वाढते.
President Barack Obama and Michelle Obama have entered into a multi-year agreement to produce films and series for Netflix, potentially including scripted series, unscripted series, docu-series, documentaries, and features.
— Netflix US (@netflix) May 21, 2018
नेटफ्लिक्स हे जगातील सर्वात मोठं ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. याचे जवळपास 125 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. 1997 मध्ये रीड हेस्टिंग आणि मार्क रेन्डोल्फद्वारे केली होती.