नवी दिल्ली : एकीकडे रशिया युक्रेन भडकलं असताना आता पश्चिम आशियातही युद्धाचे ढग निर्माण झाले आहेत. इराकच्या इर्बिल प्रांतात अमेरिकन दुतावासावर इराणमधून मिसाईल्सचा मारा करण्यात आल्याचं वृत्त आहे.
इराकच्या इर्बिल प्रांतात असलेल्या अमेरिकन दुतावासावर इराणने तब्बल 12 मिसाईल्स फायर केल्याचा आरोप अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या अधिका-यांनी केलाय.
त्यामुळे आता अमेरिका इराणला काय प्रत्युत्तर देणार याची उत्सुकता आहे. यातून जगावर दुस-या युद्धाचं संकट गडद झालंय.
इराकी अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक क्षेपणास्त्रांनी अमेरिकन दूतावासावर हल्ला केला. दूतावासाची ही इमारत नवीन असून अलीकडेच येथील कर्मचारी स्थलांतरित झाले आहेत.
अमेरिकेने या घटनेचा निषेध केला. अमेरिकेने या हल्ल्याला "निंदनीय हल्ला आणि इराकच्या सार्वभौमत्वाविरूद्ध हिंसाचाराचे प्रदर्शन" असे म्हटले.