बापरे! 12 मुलांच्या आईला करायचंय तिसऱ्यांदा लग्न, शोधतेय 10 मुलांचा बाप असलेला नवरा, कारण...

12 Children Mother: 12 मुलं असलेल्या महिलेला आता तिसऱ्यांदा लग्न करायचं आहे. त्यासाठी ती १० मुलांचा बाप असलेल्या व्यक्तीच्या शोधात आहे. त्याचे कारण एकून तुम्हीही आश्चर्चचकित व्हाल. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 14, 2023, 01:05 PM IST
बापरे! 12 मुलांच्या आईला करायचंय तिसऱ्यांदा लग्न, शोधतेय 10 मुलांचा बाप असलेला नवरा, कारण...  title=
mother of 12 children wants to remarry searching for man with 10 children

12 Children Mother: जगभरात लोकसंख्येत वाढ होताना दिसत आहे. भारतात छोट कुटुंब, सुखी कुटुंब असा नारा दिला जातो. इतकंच काय तर अनेक ठिकाणी वाढत्या महागाईमुळं एका मुलापेक्षा अधिक मुलांना जन्म देण्याचा निर्णय टाळला जातो. मात्र, न्यूयॉर्कमधील एका महिलेला 12 मूल आहेत. मात्र, ती त्यावरच समाधानी नाहीये. ही महिला एक सिंगल मदर असून ती एकटीच 12 मुलांचा सांभाळ करते. दोनदा लग्न तुटल्यानंतर आता तिला तिसऱ्यांदा लग्न करायचं आहे. त्याचे कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. 

वेरोनिका मेरिट असं या महिलेचे नाव आहे. विरोनिकाने वयाच्या 14व्या वर्षी पहिल्या मुलाला जन्म दिला होता. एकदा गर्भवती झाल्यानंतर ती अनेकदा आई झाली आहे. आता तिचे वय 37 असून 2021 साली ती तिच्या दुसऱ्या पतीपासून वेगळी झाली होती. तेव्हापासून दोन वर्ष ती एकटीच राहते. मात्र, आता तिला पुन्हा लग्न करायचं आहे. इतकंच काय तर तिची लग्नासाठी एक अट देखील आहे. वेरोनिकाला 10 मुलांचा बाप असलेल्या व्यक्तीसोबत लग्न करायचं. जेणेकरुन तिच्या मुलांची संख्या 22 होईल. त्यामागे एक कारण असल्याचेही तिने सांगितले आहे. 

ब्रिटनमधील स्यू रेडफॉर्ड या महिलेला 22 मुलं आहेत. वेरोनिकालाही रेडफॉर्डची बरोबरी करायची आहे. त्यासाठी ती 10 मुलं असलेल्या व्यक्तीच्या शोधात आहे. जेणेकरुन तिच्या मुलांची संख्या 22 होईल. याबाबत विरोनिकासोबत चर्चा केली असता ती म्हणते की, मला अजून मुलं हवी आहेत त्यासाठी मी पुन्हा पतीच्या शोधात आहे. मला असा पती हवाय ज्याला आधीपासूनच मुलं आहेत. जर माझे आधीपासूनच 10 मुलं असलेला व्यक्तीसोबत लग्न झाले तर आमचं खूप मोठं कुटुंब होईल. प्रमाणिकपणे सांगायचं झाल्यास मला खूप जास्त आवडेल. 

मला माझे कुटुंब वाढवायचे आहे. त्यामुळं मला कोणत्याही परिस्थितीत मुलांना जन्म देण्यास काहीच अडचण नाही. खरं सांगायचं झाल्यास 22 मुलं असलेल्या रेडफॉर्ड या कुटुंबावर मी जळतेय. मला ब्रिटनमधील सर्वात मोठे कुटुंब बनवायचे आहे, असं वेरोनिका सांगते. 

मला कमीत कमी ६ मुलं हवी आहेत. मात्र त्यापेक्षा अधिक झाली तर मला आनंदच आहे. मला एकदा एका डॉक्टरने सांगितले होते की तुझा जन्म मुलांना जन्मदेण्यासाठी झाला होता. त्यांनी सांगितलेली ही गोष्ट मी खूपच गांभीर्याने घेतली आहे.