Mukesh Ambani यांना दुबईची ओढ! पुन्हा 'इतक्या' कोटींचा आलिशान व्हिला केला खरेदी!

मुकेश अंबानी यांनी दुबईत आतापर्यंतच सर्वांत महागड घर घेतलं विकत, किंमत एकूण थक्क व्हाल 

Updated: Oct 20, 2022, 08:26 PM IST
Mukesh Ambani यांना दुबईची ओढ! पुन्हा 'इतक्या' कोटींचा आलिशान व्हिला केला खरेदी! title=

मुंबई : भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच दुबई प्रेम काय संपल्या संपत नाहीये. आता पुन्हा एकदा त्यांनी दुबईत एक आलिशान व्हिला (luxurious villa) खरेदी केला आहे. दुबईच्या सर्वांत हायप्रोफाईल वसाहतीत त्यांनी हा व्हिला खरेदी केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी एकाच वर्षी दुबईत दोन व्हिला खरेदी केले आहेत. त्यामुळे त्यांच्या या आलिशान विलाची चर्चा सुरू झाली आहे.  

'या' व्यक्तीकडून आलिशान व्हिला खरेदी 

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी कुवेती टायकून मोहम्मद अलशाया यांच्या कुटुंबियांकडून हा व्हिला खरेदी केला आहे. अलशाया ग्रुप ही एक बहुराष्ट्रीय रिटेल फ्रँचायझी आहे. जी मध्य पूर्व आणि युरोप, रशिया, तुर्की आणि उत्तर आफ्रिकेमध्ये 90 ग्राहक रिटेल ब्रँड चालवते. यापैकी काही ब्रँडमध्ये Victoria’s Secret, H&M आणि Starbucks यांचा समावेश आहे.

आलिशान व्हिलाची किंमत किती? 
मुकेश अंबानी (Mukesh Ambani)  यांनी पाम जुमेराह (palm jumeirah) या परिसरातून हा आलिशान व्हिला (luxurious villa) खरेदी केला आहे. या आलिशान व्हिलाची किंमत 163 दशलक्ष यूएस डॉलर म्हणजेच तब्बल 1350 कोटी रूपये आहे. 

अनंत अंबानीसाठी व्हिला खरेदी

दरम्यान याआधी मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी दुबईत सर्वात महागडं घर खरेदी केले होते. मुलगा अनंत अंबानीसाठी त्याने हे घर खरेदी केले आहे. अनंत अंबानीचं हे महागड घर बीच-साइड व्हिला पाम-आकाराच्या (कृत्रिम बेट) उत्तरेकडील भागात स्थित आहे. या घरात 10 बेडरूम, एक खाजगी स्पा आणि इनडोअर आणि आउटडोअर पूल आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीला झालेला हा करार मुकेश अंबानी (Mukesh Ambani dubai house) यांनी पूर्णपणे गुप्त ठेवला होता. मात्र या खरेदीशी संबंधित माहितीच प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध आहे. मीडिया रिपोर्टनुसार, घर खरेदीचा हा करार $80 दशलक्ष म्हणजे भारतीय चलनात सुमारे 640 कोटी रुपयांना झाला आहे. 

आलिशान व्हिला खरेदीत स्वत:चाच विक्रम मोडला ?

या वर्षाच्या सुरूवातीला त्यांनी मुलगा अनंत अंबानीसाठी आलिशान व्हिला खरेदी केला होता. या आलिशान व्हिलाची किंमत 80 दशलक्ष डॉलर (अंदाजे 640 कोटी) रूपये असल्याची माहीती आहे. त्यानंतर आता त्यांनी दुबईच्या पाम जुमेराह या परिसरातून दुसरा  आलिशान व्हिला खरेदी केला आहे. या आलिशान व्हिलाची किंमत 163 दशलक्ष यूएस डॉलर म्हणजेच तब्बल 1350 कोटी रूपये आहे. 

दरम्यान मुकेश अंबानी (Mukesh Ambani dubai house) यांचा हा दुबईतला दुसरा आलिशान बंगला असणार आहे. या आलिशान बंगल्याची आता चर्चा सुरु झाली आहे. तसेच या आलिशान व्हिलाची किंमत एकूण सर्वंच थक्क झाले आहेत.