कराची : मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड झकी उर रेहमान लखवी याला अटक करण्यात आली आहे. दहशतवादी कारवायांना आर्थिक रसद पुरवल्याचा झकी उर रेहमान लखवीवर आरोप ठेवण्यात आला आहे. या आरोपाखाली लखवीला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे FATF कारवाईपासून वाचण्यासाठी पाकिस्ताननं ही खेळी केली आहे. कारण 26/11 हल्ला प्रकरणी लखवीवर कारवाई करण्यात आलेली नाही.
2015 पासून जामिनावर असलेला दहशतवादी झकी-उर-रहमान लखवी याला दहशतवादविरोधी विभागाने (सीटीडी) अटक केली आहे. पण सीटीडीने लखवीच्या अटकेच्या जागेचा उल्लेख केला नाही. सीटीडी पंजाबने ही कारवाई केली.
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लष्कर-ए-तैयबा (लक्ष-ए-तैयबा) या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा ऑपरेशन कमांडर झकी उर रेहमान लखवी (लकीर-ए-तैयबा) याला अटक करण्यात आली. वृत्तसंस्था पीटीआयने याबाबत माहिती दिली.