नवी दिल्ली : आपल्या जगात अनेक रहस्य दडलेली आहेत. अनेक रहस्य अशी आहेत की ज्यांचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाहीये. असेच एक आश्चर्य पोर्तुगालमध्ये आहे.
पोर्तुगालमधील सिंतारा येथे अशी एक विहीर आहे ज्यामधून पाणी नाही तर चक्क प्रकाश येतो. या विहीरीत वीज पूरवठा करण्यासाठी कुठलीही व्यवस्था केलेली नाहीये. मात्र, तरीही विहीरीच्या तळातून प्रकाश येतोय.
वैज्ञानिकांनी या मागचं रहस्य जाणून घेण्यासाठी अनेक प्रयत्न केलं मात्र, त्यांना याबाबत अद्याप कुठलाही पूरावा मिळालेला नाहीये.
पोर्तुगालमधील क्यूंटा डा रिगालेरियाजवळ असलेल्या या विहीरीला सिंत्रा वेल नावाने ओळखलं जातं. या विहीरीची खोली २७ मीटर आहे. या विहीरीच्या बाजूला पायऱ्या बनवण्यात आल्या असून त्यांच्या सहाय्याने विहीरीत उतरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या विहीरीचं आर्किटेक्चर पोर्तुगाल शैलीत करण्यात आलं आहे. या विहीरीला इटालियन आर्किटेक्चर लुइगी मानिनी यांनी बनवलं आहे. या विहीरीत अनेक सुरुंग आहेत आणि त्यांच्यामधून पिवळा प्रकाश बाहेर पडताना दिसतो. हा प्रकाश म्हणजे एलईडी लाईट्स लावल्यासारखा दिसत आहे.