नारायण मूर्तींच्या जावयाला ब्रिटनच्या मंत्रिमंडळात स्थान

'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती यांचा जावई ऋषी सुनक यांना ब्रिटनच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालंय. 

Updated: Jan 10, 2018, 01:28 PM IST
नारायण मूर्तींच्या जावयाला ब्रिटनच्या मंत्रिमंडळात स्थान title=

नवी दिल्ली : 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती यांचा जावई ऋषी सुनक यांना ब्रिटनच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालंय. 

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा यांनी मंगळवारी सुएला फर्नांडिस आणि सुनक यांना आपल्या मंत्रिमंडलात सहभागी करून घेण्यात आल्याचं जाहीर केलंय. यामुळे आता ब्रिटनच्या मंत्रिमंडळात मूळ भारतीय असलेल्या मंत्र्यांची संख्या तीनवर गेलीय. 

३७ वर्षीय ऋषी सुनक यॉर्कशायरच्या सुरक्षित टोरी मतदारसंघातून २०१५ मध्ये निवडून आले होते. त्यानंतर २०१७ मध्ये पुन्हा एकदा त्यांची निवड झाली. त्यांची गृह, समुदाय आणि स्थानिक सरकारच्या मंत्रालयात राज्याचे संसदीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.


मूर्ती आपल्या मुली-जावयासोबत

ऋषी सुनक यांचा विवाह नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता हिच्याशी झालाय. स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए करताना ऋषी आणि अक्षता यांची भेट झाली होती. २००९ साली दोघांचा बंगळुरूमध्ये विवाह संपन्न झाला. ब्रिटनपूर्वी हे जोडपं अमेरिकेत राहत होतं. इथं सुनक यांचे वडील राष्ट्रीय आरोग्य सेवेत डॉक्टर म्हणून कार्यरत होते तर त्यांची आई स्थानिक स्तरावर औषधांचं दुकानं चालवत होती. 

ऋषी सुनक यांना डिजिटल अर्थ, अवैध वन्य जीवन व्यापार, परदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक आणि सामाजिक गतिशीलतासारख्या मुद्यांवर 'हाऊस ऑफ कॉमन्स'मध्ये उल्लेखनीय योगदानासाठी ओळखळं जातं