हा Dance Video पाहून नेटकरी म्हणाले, ''अरे, हे तर नेपाळचे Shahrukh-Kajol''

Nepali Shahrukh Khan and Kajol Dance Video: सध्या अनेक तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक (Viral Nepal Video) व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. नेपाळमध्ये चक्क शाहरूख खान आणि काजोल डान्स करताना दिसले आहेत. थांबा, हा व्हिडीओ नीट पाहा. कदाचित तुम्हीही गोंधळून जाल. 

गायत्री हसबनीस | Updated: May 12, 2023, 06:20 PM IST
हा Dance Video पाहून नेटकरी म्हणाले, ''अरे, हे तर नेपाळचे Shahrukh-Kajol''  title=
photo - @artistic_nepal_

Nepali Shahrukh Khan and Kajol Dance Video: शाहरूख आणि काजोलच्या चित्रपटांचे आणि गाण्यांचे आजही अनेक फॅन्स (Shahurkh Khan and Kajol Dance) आहेत. गल्लोगल्लीतले चाहते त्यांच्या गाण्यावर आजही नाचताना दिसतात. भारतातच नाही तर भारताबाहेरही शाहरूख आणि काजोलचे चाहते आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ (SRK & Kajol Video)  हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगी आणि एक मुलगा शाहरूख आणि काजोलप्रमाणे डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओच्या बॅकराऊंडला शाहरूख आणि काजोलच्या कभी खुशी कभी गम या चित्रपटातील बोले चुडिया या गाण्यावर ही दोघं नाचताना दिसत आहेत. (Nepali couple dances on shahrukh khan and kajol song bole chudiya from kabhi khushi kabhi gam viral video)

यावेळी ते दोघं फूल जोशमध्ये डान्स करताना दिसत आहेत. हे पाहून नेटकऱ्यांनी त्यांना नेपाळचे शाहरूख आणि काजोल असं म्हटलं आहे. त्यातून नेटकऱ्यांच्या नजरा तर नेपाळच्या शाहरूखपेक्षा काजोलवरच खिळल्या आहेत. यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया आल्याच्या दिसत आहेत. त्याचसोबत हा व्हिडीओ नेटकऱ्यांनाही प्रचंड (Viral Video) एन्जॉय केल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल होतो आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत अनेक व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये नेपाळच्या काजोलनं निळ्या रंगाची साडी तर शाहरूखनं पॅट आणि शाहरूखसारखी हुडी घातली आहे. 

हेही वाचा - Kartik Aryan च्या कृतीनं जिंकली चाहत्यांची मनं; ट्रॅफिकच्या नियमांचे पालन करत जिमपर्यंत चालवली बाईक

व्हायरल होताय व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये नाचणाऱ्या मुलीचे डान्स स्टेप्स पाहून तर सर्वच नेटकऱ्यांचे लक्ष तिच्याकडे वळले आहे. ती ज्या फुल एनर्जीमध्ये डान्स करते आहे त्यानुसार ती गाणं खूपच एन्जॉय करते आहे, असं नेटकऱ्यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये लिहिलं आहे. तर यापुढेही हा व्हिडीओ अनेकांनी व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ @artistic_nepal_ या युझरनं इन्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओला (Nepal Viral Dance Video) आत्तापर्यंत 5 लाख लाईक्स आले आहेत. या व्हिडीओखाली चाहत्यांनी नानातऱ्हेच्या कमेंट्सही केल्या आहेत. शिफॉनच्या निळ्या रंगाच्या साडीमधली नेपाळच्या काजोलचं नेटकऱ्यांनी कौतुक केले तर काहींनी खिल्लीही उडवली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स 

अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया उमटवल्या आहेत. काहींनी म्हटलंय की, हा व्हिडीओ 10 वेळा न थांबता पाहिला तर एकानं म्हटलंय की, या मुलीनं तर गाण्यात आपला जीवचं ओतला आहे. तर अशाच एका युझरनं म्हटलंय की मी आता नेपाळमध्येच लग्न करणार आहे. सध्या असे व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असतात. असाच हाही एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.