'या' देशाच्या पंतप्रधान होणार आई ; देशवासियांना दिली ही आनंदवार्ता

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन आई होणार असून त्यांनी त्याबद्दलची औपचारिक घोषणा केली आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 19, 2018, 08:14 PM IST
'या' देशाच्या पंतप्रधान होणार आई ; देशवासियांना दिली ही आनंदवार्ता

वेलिंगटन : न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन आई होणार असून त्यांनी त्याबद्दलची औपचारिक घोषणा केली आहे. जसिंडा यांचे हे पहिले अपत्य असणार आहे.

सर्वात तरुण महिला पंतप्रधान

देशाच्या सर्वोच्च पदी असणाऱ्या जसिंडा आर्डेन या सर्वात तरुण महिला पंतप्रधान आहेत. या सर्वोच्च पदी असताना त्या आपल्या बाळाला जन्म देणार आहेत. गेल्याचवर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी पंतप्रधान पदाची सुत्रे स्विकारली. आपला जीवनसाथी क्लार्क गेफोर्ड सोबत गुरूवारी त्यांनी ही आनंदाची बातमी सर्व देशवासियांना दिली.

देशाची सेवा आणि बाळाचे संगोपन 

देशाची सेवा आणि बाळाचे संगोपन ही दुहेरी आव्हान त्यांनी आनंदाने स्विकारले आहे. 

त्या म्हणाल्या...

संवाद साधताना त्या म्हणाल्या की, क्लार्क आणि मला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा तो आमच्यासाठी सुखद धक्का होता. जूनमध्ये बाळाचे स्वागत करण्यासाठी मी तयार आहे. त्या गर्भारपणात फक्त ६ आठवणे सुट्टी घेणार असून त्या दरम्यान उप-पंतप्रधान कारभार सांभाळतील.