नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांमध्ये हायड्रोजन बॉम्बचे परीक्षण करणाऱ्या उत्तर कोरियाच्या मिसाईल प्रोग्राममुळे संपूर्ण जग काळजीत आहे. आर्थिक प्रश्नांना समोरे जात असलेल्या उत्तर कोरियाने शेवटी अशा मिसाईल प्रोग्रामला प्रोत्साहन का दिलं? हा सवाल साऱ्यांनाच पडला आहे.
आंतरराष्ट्रीय मीडियाच्या रिपोर्टनुसार, उत्तर कोरियाच्या प्रोग्रामचा मास्टर माईंड असलेला या व्यक्तीची ओळख झाल्याचा दावा केला आहे. या व्यक्तीला उत्तर कोरियाच्या तानाशाह किम जोंग-उनचा अतिशय जवळचा आणि विश्वासू मानला जातो. असं सांगितलं जातं की, याच्याच नेतृत्वाखाली उत्तर कोरिया एकापाठोपाठ एक यश मिळवलं आहे.
१) मायकल मॅडनने येथील एरोनॉटिकल इंजिनीअर किम जोंग - सिकला देशातील मिसाइल प्रोग्राममध्ये अतिशय महत्वाची व्यक्ती असल्याचे सांगितले आहे. ही व्यक्ती उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगच्या एलीट ३८ नॉर्थ वॉचडॉगसोबत काम करणारी आहे.
२) मॅडनच्या माहितीनुसार, त्यांच्या असण्याचं महत्व यावरून स्पष्ट होतं की, सर्व मिसाइल टेस्ट आणि देशाच्या सुरक्षेशी संबंधित असलेल्या गोष्टीवर त्यांचं मत अतिशय महत्वाचं आहे. याच्याच मदतीने अनेक टेक्निकल गोष्टींना पार करून उत्तर कोरिया अगदी यशस्वी परीक्षणात यशस्वी झाला आहे.
३) मॅडनच्या माहितीनुसार, २०१२ च्या एक स्पेस लाँचिंग फक्त १० सेकंदात फेल झाले. यानंतर अवकाशातील प्रोग्रामातील नेतृत्वाला हटवून युवा इंजिनीअर किम जोंग - सिकला याच्याकडे जबाबदारी देण्यात आले आहे. याच्या नेतृत्वामध्ये उपग्रहाला अगदी यशस्वीरित्या स्पेसमध्ये पाठवल्यानंतर ते प्रमोट करण्यात आलं आहे. अगदी काही काळातच किम जोंग-उन त्याच्या जवळचा बनला.
४) आता हा संशोधक किम जोंग-सिक उत्तर कोरियाच्या अॅम्युनिशन इंडस्ट्रीचा डेप्युटी डायरेक्टर आहे. याला २० वर्षाहून अधिक काळाचा अनुभव आहे. उत्तर कोरियामध्ये परमाणु संपन्न इंटरकॉन्टिनेन्टल बॅलिस्टिक मिसाईल प्लानचा हा मास्टर माईंड म्हणून ओळखला जातो.
५) किम जोंग- सिकला उत्तर कोरियाच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केलं आहे. यासोबतच देशाच्या आर्म एम्युनिशन विभागात देखील सर्वोच्च पद देण्यात आले आहे.