नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं, की रस्ते अपघात काही बाईकस्वारांच्या चुकीनं तर काही स्टंटबाजीने तर काही ओव्हरटेक करण्याच्या नादात होतात. स्टंटमुळे जीव धोक्यात जाईल हे माहिती असताना स्टंट केले जातात.
स्टंट करण्याच्या नादात जीवघेणा अपघात झाला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता की तरुण स्टंट करायला जातो आणि खाली कोसळतो. दैव बलवत्तर म्हणून त्याच्या डोक्याला जास्त मार लागत नाही.
हा तरुण नुसता खाली कोसळतो एवढंच नाही तर काही अंतर दूर तो फेकला जातो. या अपघात पाहून अंगावर काटा येईल. पण हेल्मेटमुळे हा तरुण वाचल्याचं दिसत आहे.
असे जीवघेणे स्टंट करू नका. त्यामुळे जीवाला धोका आहे. प्रसिद्धीसाठी स्टंट करणं धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे असे स्टंट करू नका. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे त्याची माहिती मिळू शकली नाही.
इसीलिए सभी में #हेलमेट + सेफ्टी गियर्स पहनने की आदत होना ज़रूरी है.#MustWatchpic.twitter.com/hlWC3a3KhW
— Dipanshu Kabra (@ipskabra) June 23, 2022