रशिया : ओमायक्रॉनचा एक घातक सबव्हेरियंट (omicron danger varient) सापडलाय. हा आतापर्यंतच्या कोणत्याही कोरोना व्हायरसपेक्षा अधिक शक्तिशाली असल्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केलीये. (omicron danger varient researchers warn)
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आता ओमायक्रॉनचा एक नवा व्हेरियंट आढळून आल्यानं खळबळ उडालीये. रशियातील आरोग्य विभागानं याबाबत खबरदारीचा इशारा दिलाय.
रोस्पोट्रेबनादजोर या शहरातील सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमॉलॉजीमध्ये कोरोनाच्या जीनोमवर सखोल संशोधन होतंय. या शोधगटाचे प्रमुख कामिल खफीजोव्ह यांनी ओमायक्रॉनच्या बीए पॉइंट 4 सबलाईनमधील नवा व्हायरल जीनोम सापडल्याचा दावा केलाय. ओमायक्रॉनच्या अन्य कोणत्याही सबव्हेरियंटपेक्षा हा जास्त खतरनाक असून प्रचंड वेगानं पसरत असल्याचा दावा खफीजोव्ह यांनी केलाय.
लसीकरणाचा वेग कमी असलेल्या देशांमध्ये ओमायक्रॉनचे बीए पॉइंट 4 आणि बीए पॉइंट 5चा संसर्ग अधिक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनंही स्पष्ट केलंय. त्यामुळेच राज्य सरकारनं लसीकरणावर भर देण्याचा आग्रह धरलाय. तुम्ही दुसरी लस घेतली नसेल तर त्वरित घ्या... नोटीफिकेशन आलं असेल तर बुस्टर डोस घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा आणि स्वतःची काळजी घ्या.