मुंबई : लाखो भारतीय WhatsApp वापरतात. एवढेच काय तर WhatsApp ला जगभरातून पसंती दर्शवली गेली आहे. येथे लोक आपल्या मित्रांना मेसेज पाठवण्यापासून ते फोटो किंवा व्हिडीओ देखील पाठवतात. तसेच यावरुन लोक लोकेशन, तसेच ऑडिओ देखील पाठवू शकतात. WhatsApp बाजारात आल्यापासून आपल्या युजर्ससाठी वेगवेगळ्या प्रकारचे फीचर्स आणत आहे. यामध्ये लोकांच्या चॅट प्रायव्हसीचा देखील फीचर WhatsAppने आणला आहे.
परंतु असं असलं तरी WhatsApp चा एक नवीन घोटाळा (WhatsApp New Scam) समोर आला आहे. फादर्स डेच्या दिवशी एका संदेशाद्वारे व्हॉट्सऍप वापरकर्त्यांना फिशिंग स्कॅममध्ये अडकवले जात आहे. संदेशानुसार लोकांना मोफत बिअर क्रेट जिंकण्याची संधी दिली जात आहे.
व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, Heineken बीअर हे 'फादर्स डे कॉन्टेस्ट 2022' च्या विजेत्यांना बिअर ऑफर करत आहे.
यामेसेजमध्ये सांगितले जात आहे की, 'तुमच्या वडिलांसाठी बीअरने भरलेले 5,000 कूलर' देत आहे. तुम्हालाही हा मेसेज आला असेल तर सावध व्हा. कारण हा एक स्कॅम आहे.
संदेशात Heineken बीअरचे कॅरेट दाखवणारे फोटो आणि स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वेबसाइटची लिंक दर्शविली गेली आहे. लिंकवर क्लिक केल्याने वापरकर्त्यांना धोकादायक फिशिंग पेजवर नेले जाते, जे वैयक्तिक माहिती आणि खाते क्रेडेन्शियल चोरते.
व्हॉट्सऍप फिशिंग घोटाळ्याचा अहवाल ऑनलाइन ThreatsAlerts या इंटरनेट स्कॅम ट्रॅकिंग वेबसाइटने नोंदवला आहे. ज्यांनी लोकांना अशा फंदात न पडण्याचा इशाराही दिला आहे.
ही स्पर्धा म्हणजे घोटाळा असल्याचेही Heineken ने निवेदनात म्हटले आहे. कंपनी म्हणाली, 'हा घोटाळा आहे. हे आमच्यासमोर उघड केल्याबद्दल धन्यवाद. कृपया लिंकवर क्लिक करू नका किंवा कोणतेही संदेश फॉरवर्ड करू नका. खूप धन्यवाद.'
वापरकर्त्यांना एक व्हॉट्सअॅप संदेश प्राप्त होत आहे, ज्यामध्ये Heineken बीअर फादर्स डे कॉन्टेस्ट 2022 च्या विजेत्यांना 5000 Heineken ने भरलेले कूलर दिल्याचा दावा केला आहे. लिंकवर क्लिक केल्यावर, वापरकर्त्यांना दुर्भावनापूर्ण वेबसाइटवर नेले जाते.
जे केवळ वैयक्तिक माहिती आणि खाते क्रेडेन्शियल्स चोरत नाही, तर अनवॉन्टेड सेवांसाठी साइन अप करण्यासाठी देखील फसवणूक करते.
लिंकवर क्लिक करणार्या वापरकर्त्यांना 20 संपर्कांपर्यंत ही लिंक पोहोचवायची असते. म्हणून जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही संपर्कांकडून असा संदेश आला तर, तो उघडू नका. Heinekenचे नाव अशा प्रकारे वापरण्याची ही पहिलीच वेळ नाही. वापरकर्त्यांना अडकवण्यासाठी हा घोटाळा आहे.
याआधी 2018 मध्ये तसेच 2020 मध्येही असाच मेसेज व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला होता. केवळ व्हॉट्सअॅपच नाही तर हे स्कॅम मेसेज ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातूनही व्हायरल केले जातात.