close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बालाकोट हवाई स्ट्राइकचा व्हायरल होणारा व्हिडिओ ६ वर्षांपूर्वीचा

सोशल मीडियावर सकाळपासून एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडिओ पाकिस्तानमधील बालाकोट हवाई स्ट्राइकचा नसल्याची बाब पुढे आली आहे. 

Updated: Mar 13, 2019, 05:08 PM IST
बालाकोट हवाई स्ट्राइकचा व्हायरल होणारा व्हिडिओ ६ वर्षांपूर्वीचा

नवी दिल्ली : सोशल मीडियावर सकाळपासून एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडिओ पाकिस्तानमधील बालाकोट हवाई स्ट्राइकचा नसल्याची बाब पुढे आली आहे. हा व्हिडिओ सहा वर्षांपूर्वीचा असल्याचे पुढे आले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान हद्दीत घुसून बालाकोट येथील दहशतवादी प्रशिक्षण तळांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात २५० दहशतवादी ठार मारल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये २०० मृतदेहहाती लागल्याचे बोलले जात आहे. हा हल्ला बालाकोटचा असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, हा व्हिडिओ सहा वर्षांपूर्वीचा असल्याचे पुढे आले आहे. तसेच या व्हिडिओत पाकिस्तान लष्करी अधिकारी असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, पाकिस्तानची पॅरा मिलिट्री फोर्स फ्रंडिअर कोर्प्स आहे. फोर्स फ्रंडिअर कोर्प्स खैबर पख्तूनवा आणि बलुचिस्तानमध्ये तैनात असते. हा व्हिडिओ अमन लष्कर (लष्कर-ए-तैयबा विरुद्ध संघटना) च्या लढाईत मारले गेलेल्या  फ्रंडिअर कोर्प्सच्या जवानांचा आहे.

सोशल मीडियावर या व्हिडिओचा दावा करण्यात आला होता की, पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्यांनी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबांना मदत करत आहेत. त्यांना दिलासा देण्याचे काम करत आहेत. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी सेना अधिकारी काही लोकांमध्ये बसलेले दिसतात. व्हिडिओमध्ये, तरुण लोक म्हणत आहेत, "कालच्या हल्ल्यात २०० लोक मरण पावले आहेत. मात्र, ते अल्लाहच्या नावाने शहीद झाल्याचे अधिकारी बोलत आहे.

हा व्हिडिओ पाकिस्तानी सैनिकी अधिकारी गावकऱ्यांना सांगत आहे. 'आता आपण सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे. जो खरा युद्धाशी उभा रहातो आणि प्रतिस्पर्धीशी लढाई करतो तो जिहाद आहे.' यानंतर, व्हिडिओमधील एक माणूस गोळीबारात पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्याला रडणारा मुलगा देतो. पाकिस्तानी सैन्यातील अधिकारी मुलाचे सांत्वन करताना दिसत आहेत. यानंतर व्हिडिओमध्ये एक आवाज आहे. 'हे रतुबा अल्लाहमुळे हे शक्य होते. त्यांच्यावर अल्लाहाची कृपा असते. ते अल्लाहच्या नावाने शहीद होतात. त्यांच्यावर अल्लाहाची कायम नजर राहते.

दरम्यान, स्थानिक उर्दू वृत्तपत्रांच्या माहितीनुसार, जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो, खूप जुना आहे. तो सहा वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळे बालाकोट हल्ल्याचा याच्याशी काहीही संबंध नाही. बालाकोट हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी येथून खैबर पख्तुनवा आणि इतर आदिवासी भागांमध्ये जवळपास २०० मृतदेह पाठवण्यात आले. असे जे बालाकोट हल्ल्याबाबात सांगितले जात आहे, ते खोटे असल्याचे पुढे आले आहे.

बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर  भारतीय विमानांनी तब्बल १००० किलो स्फोटकांचा मारा केला होता. भारताकडून २५० दहशतवादी मारले गेल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, पाकिस्तानकडून आमचा या हल्ल्यात कोणीही मारले गेले नसल्याचे सांगण्यात येत आहे.