Pakistan Blast: पाकिस्तान भीषण स्फोटाने हादरला आहे. पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तुनख्वात येथे हा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात 50 जणांचा मृत्यू झाला आहे. 400 पेक्षा अधिक लोक या स्फोटात जखमी झाले आहेत. स्फोट झाला त्या ठिकाणी सध्या युद्ध पातळीवर बचावर कार्य सुरु आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालायत भरती केले जात आहे. या स्फोटामुले पाकिस्तानात एकच खळबळ उडाली आहे.
रविवारी सायंकाळच्या सुमारास हा स्फोट झाला. पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तुनख्वाच्या बजोर प्रांतात भीषण स्फोट झालां. या भागात जमीयत उलेमा इस्लाम संघटनेच्या (JUI-F) कार्यकर्त्यांचं संमेलन होतं हा स्फोट झालाय. तिथे झालेल्या स्फोटात 50 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 150हून अधिक लोकं जखमी झालेत. त्यांच्यावर पेशावरमध्ये उपचार केले जाणार असल्याची माहिती आपात्कालीन अधिका-यांनी दिली. या स्फोटाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
या स्फोटात जमीयत उलेमा इस्लाम संघटनेच्या नेत्याचा देखील मृत्यू झाला आहे. झियाउल्लाह जान असे मृत नेत्याचे नाव आहे. यासह अनेक नेते जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या स्थानिक वृत्त माध्यमाध्यमांनी याबाबत माहिती दिली आहे. हा स्फोट नेमका कसा झाला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.