व्हिडिओ: निवडणूक प्रचारासाठी उमेदवार थेट गटारात

मते मागण्यासाठी या उमेदवाराने केलेल्या स्टंटचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Updated: Jul 11, 2018, 03:22 PM IST
व्हिडिओ: निवडणूक प्रचारासाठी उमेदवार थेट गटारात
छायाचित्र सौजन्य: Ayaz Memon Motiwala फेसबुक

कराची: मतांचा जोगवा मागण्यासाठी उमेदवार काय काय शक्कल लढवतील हे सांगता येत नाही. पाकिस्तानातील  निवडणुकीत तर एक धक्कादायक प्रकारच पहायला मिळाला. इथे एक उमेदवार निवडणूक प्रचार करण्यासाठी थेट गटारात उतरला. या उमेदवाराने गटारात उतरून मतदार राजाला मत देण्याचे अवाहन केले. तर, विरोधकांवर टीका केली. मते मागण्यासाठी या उमेदवाराने केलेल्या स्टंटचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

अयाज मेमन असे या उमेदवाराचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार येत्या २५ जुलैला पाकिस्तानात एक निवडणूक होत आहे. अयाज मेमन हे या निवडणुकीतल एक उमेदवार असून, सफाई हा त्यांनी प्रचाराचा मुद्दा बनवला आहे. त्यांच्या निवडणूक प्रचाराचा हटके अंदाज पाहून तुम्हीही हैराण व्हाल.