सुषमांच्या भाषणानंतर पाकिस्तानचा जळफळाट...

संयुक्त राष्ट्र महासभेत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचा बुरखा फाडल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. मात्र स्वराज यांच्या जळजळीत टीकेने पाकिस्तानचा मात्र जळफळाट झालाय.

Updated: Sep 24, 2017, 09:19 AM IST
सुषमांच्या भाषणानंतर पाकिस्तानचा जळफळाट...  title=

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्र महासभेत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचा बुरखा फाडल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. मात्र स्वराज यांच्या जळजळीत टीकेने पाकिस्तानचा मात्र जळफळाट झालाय.

'राईट टू रिप्लाय' अंतर्गत दिलेल्या उत्तरात पाकिस्तानचा जळफळाट समोर आलाय. या उत्तरात पाकिस्ताननं पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवलाय.

दहशतावादावर न बोलता पाकिस्ताननं काश्मीरला वादग्रस्त प्रदेश असं म्हटलंय. तसंच काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग मानण्यासही पाकिस्ताननं नकार दिलाय.

भारत सरकार आणि राज्यकर्ते पाकिस्तानला शत्रू मानत असल्याचा कांगावा पाकिस्तानकडून करण्यात आला. काश्मीरमध्ये भारतीय सैन्याकडून अत्याचार सुरु असल्याचा खोडसाळ आरोपही पाकिस्ताननं यावेळी केलाय.

काश्मीर प्रकरणी संयुक्त राष्ट्रानं दखल घेत जनमत चाचणी घेण्याची मागणी पाकिस्ताननं केली.