व्हिडिओ : सोशल मीडियावर व्हायरल झाला पाकिस्तानी अरिजीत सिंग

इंटरनेटवरील क्रांतीने दोन गोष्टी अगदी सामान्य झाल्या आहेत.

Updated: Aug 7, 2018, 01:14 PM IST
व्हिडिओ : सोशल मीडियावर व्हायरल झाला पाकिस्तानी अरिजीत सिंग

मुंबई : इंटरनेटवरील क्रांतीने दोन गोष्टी अगदी सामान्य झाल्या आहेत. एक तर व्हायरल होणे आणि दुसरे ट्रोल होणे. इंटरनेटच्या सर्वव्यापी वापरामुळे आपली कला इतरांपर्यंत पोहचवणे अगदी सोपे आणि स्वस्त झाले आहे. त्यामुळे नवनवे कलाकार समोर येत आहेत आणि त्यांची जादू युट्युब आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चालत आहे.

अशाच प्रकारचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. पाकिस्तानचा एक पेंटर काम करताना गाणे गात आहे. पण त्याच्या आवाज इतका सुरेल आहे की त्याला ऐकत राहावेसे वाटते. हा गायक अरिजीत सिंगची गाणी गात आहे.
मोहम्मद आरिफ सुमारे १५ मिनिटांच्या या व्हिडिओत सुंदर गाणी गात आहे. पण आवाज अरिजीत सिंग सारखा असल्यासारखे वाटते. पण याचा गायिकीशी काही संबंध नाही. पण आवाज अत्यंत सुरेल आहे.

याचे हे व्हिडिओज सोशल मीडियावर युजर्सची पसंती मिळवत आहेत. लोकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर गाणे सुरु ठेव, तुला संधी नक्की मिळेल, असा प्रेरणादायी संदेशही दिला आहे.