पॅलेस्टिनी राजदूत, पाकिस्तान आणि हाफीझ सईद

भारताच्या तीव्र आक्षेपामुळे नवीन राजदूताची नेमणूक होणार

Updated: Jan 1, 2018, 03:08 PM IST
पॅलेस्टिनी राजदूत, पाकिस्तान आणि हाफीझ सईद title=

नवी दिल्ली : भारताच्या तीव्र आक्षेपामुळे नवीन राजदूताची नेमणूक होणार

हाफीझ सईदचा मेळावा

हाफीझ सईदने अलिकडेच एका मेळाव्याचं आयोजन केलं होतं. पॅलेस्टिनचे पाकिस्तानातील राजदूत वालिद अबू अली या मेळाव्याला उपस्थित होते. भारताने याला तीव्र आक्षेप घेत पॅलेस्टिनच्या भारतातील राजदूतांची कानउघाडणी केली.  

भारताची नाराजी

पॅलेस्टिनने भारताच्या नाराजीची तातडीने दखल घेतली. त्यांनी त्वरीत आपल्या पाकिस्तानातील राजदूतांना माघारी बोलवलं आहे. भारत आणि पॅलेस्टिनचे मैत्रीपूर्ण संबंध बघता पॅलेस्टिनने तातडीने याबाबतीत पावलं उचलली आहेत. 

भारत पॅलेस्टिन संबंध

हाफीझ सईद याला आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी घोषित केलं गेलंय. त्याच्यावर मोठं बक्षिसही जाहीर केलेलं आहे. असं असतानासुद्धा पॅलेस्टिनचे राजदूत हाफीझ सईदने आयोजित केलेल्या मेळाव्याला उपस्थित राहतात, ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत अनेकवेळा पॅलेस्टिनची पाठराखण केली आहे. त्यामुळे या घटनेचं महत्व प्रचंड आहे.