तेजगाम एक्स्प्रेस दुर्घटना: रेल्वेत प्रवाशी अंडे उकडवत असताना सिलेंडरचा स्फोट

सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ३ बोग्या खाक

Updated: Oct 31, 2019, 12:54 PM IST
तेजगाम एक्स्प्रेस दुर्घटना: रेल्वेत प्रवाशी अंडे उकडवत असताना सिलेंडरचा स्फोट title=

नवी दिल्ली : भारताच्या शेजारीला देश पाकिस्तानमध्ये गुरुवारी सकाळी एक मोठा दुर्घटना घडली. कराची-रावळपिंडी तेजगाम एक्सप्रेसमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ३ बोग्या खाक झाल्या आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत ६० हून अधिक जणांना मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. ट्रेनमध्ये काही जण अंडे उकडवत असताना सिलेंडरला आग लागली आणि ही घटना घडल्याचं बोललं जातं आहे. 

पाकिस्तानी वर्तमानपत्र डॉनने म्हटलं की, रेल्वे मंत्री शेख राशिद यांच्या माहितीनुसार रेल्वेमध्ये काही जण नाश्ता बनवत होते. त्यामुळेच सिलेंडरचा स्फोट होऊन रेल्वेच्या ३ बोग्या जळून खाक झाल्या. रेल्वेतून प्रवास करत असलेले अनेक जण होरपळले गेले. पाकिस्तानी मीडियाच्या माहितीनुसार, रेल्वेत काही जण अंडे उकडवत असल्यामुळेच ही घटना घडल्याचं बोललं जात आहे.

पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख राशिद यांनी म्हटलं की, ज्य़ा तीन बोगींमध्ये आग लागली होती. त्यापैकी २ इकॉनोमी क्लास होत्या, तर एक बोगी ही बिझनेस क्लास होती. सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत.

स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार, सकाळी नमाज अदा केल्यानंतर काही जण रेल्वेतच नाश्ता बनवत होते. ज्यामुळे सिलेंडरचा स्फोट झाला. २ सिलेंडर फुटल्यामुळे ३ बोगींमध्ये झपाट्याने आग पसरली.

आग लागलेल्या या ३ बोगींमध्ये जवळपास २०० लोकं प्रवास करत होते. जे एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जात होते. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांमध्ये पुरुषांची संख्या जास्त आहे.