पंतप्रधान मोदींच्या आधी या राष्ट्राध्यक्षाने घेतलेला 'Man vs Wild' मध्ये भाग

डिस्कवरीवरील हा लोकप्रिय शो आहे.

Updated: Jul 29, 2019, 01:23 PM IST
पंतप्रधान मोदींच्या आधी या राष्ट्राध्यक्षाने घेतलेला 'Man vs Wild' मध्ये भाग title=

मुंबई : डिस्कवरीवरील मॅन Vs वाईल्ड या कार्यक्रमात अनेक थरारक गोष्टी पाहायला मिळतात. हा कार्यक्रम जगभरातील लोकं मोठ्या आवडीने बघतात. बियर ग्रिल्स हा ज्या प्रकारे जंगलात कशा प्रकारे राहतो आणि कशा प्रकारे प्राण वाचवले जावू शकतात याची माहिती देतो. ते सगळ्यांनाच पाहायला आवडतं. पण आता या कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील दिसणार आहेत. १२ ऑगस्टला रात्री ९ वाजता हा कार्यक्रम प्रदर्शित होणार आहे. पंतप्रधान मोदींनी जंगलात कशा प्रकारे वेळ घालवला याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.

बराक ओबामा

याआधी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी देखील या कार्यक्रमात भाग घेतला होता. अशा कार्यक्रमात भाग घेणारे ते पहिले राष्ट्राध्यक्ष होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष असलेले बराक ओबामा हे त्यांच्या वेगळ्य शैलीमुळे ओळखले जातात. 

बराक ओबामा यांनी अलास्काच्या देनाली डोंगराळ भागात याची शूटींग केली होती. वातावरण बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगचा परिणामांचा अनुभव घेण्यासाठी त्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला होता.

आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी या कार्यक्रमात भाग घेतला आहे. थरारक अशा गोष्टी अनेकांनी या कार्यक्रमातून अनुभवला आहे.