काश्मीर मुद्द्यावर मोदींचं ट्रम्प यांच्यासमोर पाकिस्तानला सडेतोड उत्तर

काश्मीर मुद्द्यावर पंतप्रधान मोदींचं सडेतोड उत्तर

Updated: Aug 26, 2019, 04:47 PM IST
काश्मीर मुद्द्यावर मोदींचं ट्रम्प यांच्यासमोर पाकिस्तानला सडेतोड उत्तर

बिआरिब्ज : काश्मीर तसेच भारत आणि पाकिस्तानमधील सर्वच मुद्दे हे द्विपक्षीय असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांच्यासमोर स्पष्ट केले. मोदी आणि ट्रम्प यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थीची गरज नाही. ते दोघेही चर्चेने मुद्दे सोडवतील असेही मोदी म्हणाले. अमेरिकेच्या सर्व सुचनांचे स्वागत असल्याचे मोदींनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी  २४ ते २७ ऑगस्ट दरम्यान जी-७ परिषदेसाठी फ्रान्समध्ये आहेत. या परिषदेसाठी जी-७ गटाचे सदस्य नसलेल्या काही देशांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. यात भारताचाही समावेश आहे. या परिषदेमध्ये मोदी-ट्रम्प यांच्यात विविध प्रश्नांवर द्विपक्षीय चर्चा झाली आहे. 

मोदी हे अतुलनीय व्यक्तीमच असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. काश्मीर मुद्द्यावर भारत पाकिस्तानसोबत चर्चा करून मार्ग काढेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. या वक्तव्यामुळे पाकिस्तानला जोरदार झटका बसला आहे. याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्रम्प यांच्याकडे या मुद्द्यावर मध्यस्थी करण्याची मागणी केली होती.

यआधी जुलै महिन्यात ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींनी आपल्याला काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यासाठी सांगितले होते असा दावा केला होता. पण आज ट्रम्प यांनी यावरून यूटर्न घेतला. चीनशिवाय पाकिस्तानला कोणीही समर्थन न केल्याचेही यानिमित्तान स्पष्ट झाले आहे.

या गटाच्या सात देशांशिवाय भारत, ऑस्ट्रेलिया, स्पेन, दक्षिण आफ्रिका, सेनेगल आणि रवांडा या देशांच्या प्रमुखांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रेडो, जर्मिनीच्या चान्सलर अँजेला मार्केल, जवानचे पंतप्रधान शिंझो आबे, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युल मॅक्रॉन आणि इतर नेते या परिषदेत आहेत.