शिक्षणाच्या नावाखाली मुजरा पार्टी, व्हिडिओ व्हायरल

एका मुजरा पार्टीमुळे पाकिस्तान सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. तसेच सोशल मीडियावरही पाकिस्तान सरकारची नाचक्की झाली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 21, 2017, 08:57 PM IST
शिक्षणाच्या नावाखाली मुजरा पार्टी, व्हिडिओ व्हायरल title=

नवी दिल्ली : एका मुजरा पार्टीमुळे पाकिस्तान सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. तसेच सोशल मीडियावरही पाकिस्तान सरकारची नाचक्की झाली आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

पीओके म्हणजे पाक व्याप्त काश्मीरमध्ये शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक फंड जमा करण्यात आला होता. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे या फंडचा वापर करत लंडनमध्ये एका मुजरा पार्टीचं आयोजन केल्याचा प्रकार समोर आला आहे.

लंडनमध्ये ज्या ठिकाणी या मुजरा पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं त्याच ठिकाणी पीओके अध्यक्ष सरदार मसूद खान उपस्थित होते.

या मुजरा पार्टीचा एक व्हिडिओ पाकिस्तानी न्यूज चॅनल ९२ ने प्रसारित केला आहे. तसेच सोशल मीडियातही मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.

सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत पीओके अध्यक्ष सरदार मसूद खान हे डान्सरसोबत अश्लील डान्स करताना दिसत आहेत.