G-7 Summit 2023: जपानच्या हिरोशिमामध्ये G7 शिखर परिषद आयोजीत करण्यात आली आहे. G-7 बैठकीतील एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन (Joe Biden) हे स्वत: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याकडे चालत आल्याचे दिसत आहे. यामुळे पंतप्रधान मोदी यांचे जागतिक पातळीवरील महत्व पून्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
जी-7 राष्ट्रांच्या बैठकीदरम्यान हिरोशिमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट झाली.. यावेळी दोन्ही देशांच्या नेत्यांनी गळाभेट करत एकमेकांना अभिवादन केलं. बायडेन आणि मोदी यांच्या या गळा भेटीमुळे चीनला मात्र, धडकी भरली आहे.
#WATCH | Prime Minister Narendra Modi and US President Joe Biden share a hug as they meet in Hiroshima, Japan. pic.twitter.com/bbaYMo1jBL
— ANI (@ANI) May 20, 2023
G-7 च्या वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट झाली. यावेळी PM मोंदी यांनी झेलेन्स्की यांच्याशी युद्धस्थितीबबात चर्चा केली. युक्रेन युद्ध हा जगासाठी मोठा मुद्दा आहे. या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. हे युद्ध राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण सगळ्यांशी निगडीत आहे. युद्ध थांबवण्यासाठी मी भारताच्या वतीन संपूर्ण सहकार्य करेन असे आश्वासन PM मोदी यांनी दिले. झेलेन्स्की यांच्या सोबतच्या या बैठकीला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेही उपस्थित होते.
G-7 च्या वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या हिरोशिमा दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधानांनी जपानमधील हिरोशिमा येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले. जगाला शांततेचा संदेश देणारी बुद्ध आणि गांधींची भूमी आणि भगवान बुद्धांच्या विचारांचा जपान, पूज्य बापूंची मूर्ती त्यांना पुढे नेण्यासाठी मोठी प्रेरणा ठरेल असं ते यावेळी म्हणाले. या परिषदेत जपान आणि अमेरिका व्यतिरिक्त ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा आणि इटली तसेच युरोपियन युनियनचे प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी झाले आहेत.
पुढील महिन्यात पंतप्रधन नरेंद्र मोदी अमेरिका दौ-यावर जाणार आहेत. दोन्ही देशांमधील संबंध आणखी मजबूत करण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा असणार आहे. 19 मे ते 21 मेपर्यंत मोदी 3 देशांच्या दौ-यावर असतील. या परिषदेमध्ये रशिया-युक्रेन युद्ध, अन्नसुरक्षा अश्या अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.