71 वर्षांनंतर हरवलेले गाव सापडले, तलावाखाली मिळाले अवशेष

 71 वर्षांपूर्वी हरवलेले गाव (Village Curon) सापडले आहे. हे समजल्यानंतर लोक याबाबत आश्चर्यचकित झाले आहेत.

Updated: May 21, 2021, 02:40 PM IST
 71 वर्षांनंतर हरवलेले गाव सापडले, तलावाखाली मिळाले अवशेष

मुंबई : आजकाल इटलीमधील  (Italy) रेसिया तलाव (Resia Lake) लोकांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. हा तलाव त्याच्या 14 व्या शतकात बर्फाखाली असलेल्या पाण्यातील चर्चसाठी  (Church) प्रसिद्ध आहे. मात्र, आता या क्षणी येथे हरवलेले गाव (Village Curon) सापडले आहे. हे समजल्यानंतर लोक याबाबत आश्चर्यचकित झाले आहेत.

Church in the Middle Of Iced Lake

 रेशिया तलाव  (Lake Resia) टायरॉलच्या (Tyrol)अल्पाइन प्रदेशात आहे. हा तेथील सर्वात प्रसिद्ध कृत्रिम तलावांपैकी (Artificial Lake) एक आहे. याचे पाणी बर्फाचे आहे आणि मध्यभागी तेथे 14 व्या शतकातील चर्च टॉवर आहे. टायरॉल नावाची जागा ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडच्या सीमेवर आहे. अहवालानुसार, कित्येक वर्षांनंतर त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु झाले. त्यावेळी तलावाचे पाणी कमी होऊन तलाव तात्पुरता कोरडा करण्यात आला. यावेळी काही लोकांना पाण्यात बुडलेल्या गावाची छायाचित्रे बघायला मिळाली. रेशिया तलाव  (Lake Resia) जर्मनमध्ये (German) रेचेन्सी (Reschensi) म्हणूनही ओळखले जाते. 

More Than 160 Houses Were Swept Under Lake Resia

बीबीसीच्या वृत्तानुसार, 1950 मध्ये तलावासमोर एक क्यूरॉन नामाचे गांव (Village Curon) होते.  या गावात अनेक लोक राहत असत. जलविद्युत प्रकल्प  (Hydroelectric Plant) तयार करण्यासाठी सरकारने 71 वर्षांपूर्वी धरण बांधले, त्यासाठी दोन तलाव विलीन करून एक मोठा तलाव बनविण्यात आला.  दोन लहान लतावांना एकत्र करुन मोठा तलाव बांधण्यात आला.

Curon Village was Underground Lake Resia

तलावात बुडालेले गाव सापडल्यानंतर याची जोरदार चर्चा सुरु झाली. या गावात तब्बल 160 घरे आणि गुहा असं बरच काही सापडले. इटलीमधील या तलावामध्ये अनेक दशकांनंतर दिसून आलेल्या या गावाचे नाव क्यूरॉन आहे. 1950 मध्ये या गावात विद्युत प्रकल्प स्थापन करण्यात आला. त्याचवेळी या गावात महापूर आला.  त्यात हा गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. 

2 Lakes Were Combined To Form Lake Resia
 
ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडला लागून असलेल्या इटलीच्या सीमेजवळ असलेल्या तलावामधून एका जलाशयाच्या दुरुस्तीसाठी पाणी कमी करण्यात येत होते. तलाव कोरडा केल्यानंतर हे गाव दिसून आले. या गावात60 घरे असल्याचे समोर आले आहे.  सुरुवातील 14 व्या शतकातील एका चर्चची मिनार पाण्याबाहेर आली. नंतर पाण्याची पातळी घटू लागल्यावर तलावाच्या तळाशी असलेल्या या गावातील गुहा आणि भिंती दिसू लागल्या.

Place Is Famous Among Hikers

येथे राहणाऱ्या एका महिलेने ट्विट करुन सांगितले की, जुन्या घरांच्या अवशेषांवरुन चालणे हा एक वेगळा अनुभव होता. हा भाग हायकर्ससाठी खूप लोकप्रिय आहे. त्यांच्याद्वारे गावाचे भयावह चित्र सोशल मीडियावर व्हायरल केले गेले आहे. तर दुसऱ्या एका अन्य ट्विटर युझरने म्हटले आहे की, हे क्युरॉन नावाच्या गावाचे अवशेष आहेत. हे गाव अनेक दशकांपूर्वी बुडाले होते. इटलीमधील  रेसिया तलावातून (Resia Lake) पाणी बाहेर काढताना हे अवशेष आता बाहेर आले आहेत.