कीव: रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यात युद्ध सुरु आहे. युक्रेनच्या सैन्याकडून कडवा प्रतिकार रशिया मिळत आहे. या युद्धात शौर्य गाजवणाऱ्या जवानांना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर जेलेंस्की (Volodymyr zelensky) सन्मानित करत आहेत. जेलेंस्कींकडून रविवारी सैनिकांना पुरस्कर देण्यात आले. या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सगळ्यात लहान सैनिकाला देखील सन्मानित करण्यात आले आहे.
हा सैनिक नाही. मात्र याचे कार्य एका सैनिकापेक्षा कमी नाही. याचे नाव पेट्रन (Patron) आहे. हा एक कुत्रा आहे.
युक्रेनच्या भाषेत पेट्रन नावाचा अर्थ होतो दारुगोळा. पेट्रनने अनेक रशियाचे बॉम्ब शोधून काढले आहेत आणि लाखो नागरिकांचे जीव वाचवले आहेत. त्यामुळे पेट्रनला सन्मानित करण्यात आलं आहे.
युक्रेनच्या इशान्यकडे असणाऱ्या चेर्निहाइव मध्ये या श्वानाने लॅण्ड माइन आणि बॉम्ब शोधून काढले आहेत.
पेट्रनने आतापर्यंत 200 पेक्षा अधिक बॉम्ब शोधून काढले आहेत. पेट्रनने केलेल्या कार्याचं अनेक स्तरातून कौतूक होतंय. मात्र ही युक्रेनची रणनिती असल्याचं जाणकारांचे म्हणणे आहे. कारण पेट्रनचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल आहेत. जाणकारांचे म्हणणे आहे की, अनेक फोटोंमध्ये पेट्रन सैनिकी गणवेशात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे देशातील जनतेचे लक्ष फक्त युद्धावर केंद्रीत व्हावं.
युक्रेनचा पेट्रनला लहान मुलं खूप प्रेम करत आहेत. इतकंच नव्हे तर कॅनडाचे पंतप्रधान सुद्धा त्याचे फॅन आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो युक्रेनच्या अघोषित दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी पेट्रनची भेट घेतली.