Twitter मागोमाग 'या' आणखी एका बड्या कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा

एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरची (Twitter layoffs) सूत्र हाती घेतल्यानंतर या कंपनीच्या कार्यकारिणीमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात करत कंपनीनं आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णयही घेतला.

Updated: Nov 7, 2022, 12:05 PM IST
Twitter मागोमाग 'या' आणखी एका बड्या कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा  title=
shocking news after twitter Facebook plans huge Layoffs this week

Twitter Layoffs News : एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरची (Twitter layoffs) सूत्र हाती घेतल्यानंतर या कंपनीच्या कार्यकारिणीमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात करत कंपनीनं आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णयही घेतला. त्यामामोमागच आता वैश्विक स्तरावर प्रसिद्ध असणाऱ्या आणखी एका बड्या कंपनीतून कर्मचाऱ्यांना रामराम करण्यात येणार आहे. आतापर्यंत मोठ्या संख्येनं नव्या जोमाच्या तरुणाईला नोकरीची संधी देणाऱ्या या कंपनीनं कर्मचारी कपात करण्याचा घेतेलला निर्णय अनेकांना धक्का देत आहे. (shocking news after twitter Facebook plans huge Layoffs this week)

Twitter च्या पावलावर पाऊल ठेवणारी ही कंपनी आहे फेसबुक (Facebook) ची पॅरेंट फर्म, मेटा (Meta). या आठवड्यामध्ये मेटा- फेसबुकसाठी काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे. Wall Street Journal नं यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार जगभरात सध्याच्या घडीला मेटाचे 87 हजारहून अधिक कर्मचारी आहेत. यामध्ये फेसबुक (Facebook), इन्स्टाग्राम (Instagram) आणि व्हॉट्सअॅपसाठी (Whats app) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही जास्त आहे.

वाचा :

Twitter मधून बाहेरचा रस्ता दाखवलेल्या भारतीय कर्मचाऱ्याची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल; त्यातून बरंच शिकण्यासारखं

दरम्यान, CEO मार्क झुकरबर्ग (mark zuckerberg) यांनी दिलेल्या माहितीनुसार 2023 पर्यंत कंपनीमध्ये कोणत्याही नव्या कर्मचाऱ्यांनी निवड केली जाणार नसून, उलटपक्षी कर्मचारी संख्या कपात केली जाणार आहे. 2023 मध्ये आपण कंपनीत काम करणाऱ्या होतकरु कर्मचाऱ्यांवर अधिकाधिक गुंतवणूक करणाऱ्यावर भर गेणार असल्याचंही ते काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. टीम मेहनती कर्मचाऱ्यांच्या बळावर पुढे जाण्यासाठी कामचुकारपणा करणाऱ्यांना फेसबुक/ मेटा बाहेरचा रस्ता दाखवणार आहे.

कर्मचाऱ्यांना केव्हा दाखवणार बाहेरचा रस्ता?

WSJ च्या माहितीनुसार मेटा बुधवारी म्हणजेच 9 नोव्हेंबरपासून कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्यास सुरुवात करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यामध्ये हजारो कर्मचारी नोकरी गमावणार असून, ही आतापर्यंत होणारी सर्वात मोठी कर्मचारी कपात ठरणार आहे.

मेटाचे शेअर कोसळले (Meta share price)

यावर्षी मेटाच्या शेअर्समध्ये कमालीची घसरण पाहायला मिळाली होती. येत्या काळात हा आकडा 73 टक्क्यांपर्यंत कोसळू शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे. 2016 पेक्षाही कमी स्तरावर आलेले हे शेअर अमेरिकी बाजारातील S&P 500 इंडेक्सचे सर्वात वाईट परफॉर्म करणारे शेअर्स ठरले आहेत. या वर्षभरात मेटाच्या शेअर्समध्ये 67 अरब डॉलर्सची घट झाली आहे, ज्यामुळं कंपनीला मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागत आहे.