Twitter मधून बाहेरचा रस्ता दाखवलेल्या भारतीय कर्मचाऱ्याची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल; त्यातून बरंच शिकण्यासारखं

एलॉन मस्क (Elon Musk) यांच्याकडे ट्विटरची (Twitter) जबाबदारी जाताच त्यांनी या कंपनीमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला वरिष्ठ हुद्द्यांवरील कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता (Twitter Layoffs ) दाखवल्यानंतर आता सर्वसामान्य कर्मचाऱ्यांची नोकरीही संकटात आली आहे. 

Updated: Nov 5, 2022, 12:41 PM IST
Twitter मधून बाहेरचा रस्ता दाखवलेल्या भारतीय कर्मचाऱ्याची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल; त्यातून बरंच शिकण्यासारखं  title=
twitter laying off indian mans post who got fired from firm is trending

Twitter Layoffs in India: एलॉन मस्क (Elon Musk) यांच्याकडे ट्विटरची (Twitter) जबाबदारी जाताच त्यांनी या कंपनीमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला वरिष्ठ हुद्द्यांवरील कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता (Twitter Layoffs ) दाखवल्यानंतर आता सर्वसामान्य कर्मचाऱ्यांची नोकरीही संकटात आली आहे. आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर ट्विटरकडून भारतात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही रामराम ठोकण्यात येत आहे. त्यातच एका 25 वर्षीय भारतीय कर्मचाऱ्याच्या नोकरीवरही गदा आली आहे. (twitter laying off indian mans post who got fired from firm is trending)

जगातील अग्रगणी सोशल नेटवर्किंग साईट्सपैकी (Social Networking site) एक असणाऱ्या ट्विटरची नोकरी गमावल्यानंतर या तरुणाने एक सोशल मीडिया पोस्ट केली. ज्यामध्ये त्या तरुणानं लिहिलेला प्रत्येक शब्द नेटकऱ्यांना खूप काही शिकवून गेला. 

काय म्हणाला नोकरी गमावलेला तरुण? 

यश अग्रवाल असं या तरुणाचं नाव. आपली ट्विटरमधील नोकरी गेल्यानंतर त्यानं Tweet करत लिहिलं, 'नुकताच कामावरून काढलो गेलोय. या टीमचा भाग असणं आणि त्यांच्यासोबत, त्या वातावरणात काम करणं ही अतिशय सन्मानाची बाब होती'. ट्विटरच्याच काही वस्तू हातात घेतलेला आपला एक फोटोही या तरुणानं शेअर केला. 

नोकरी गेल्याचं दु:ख नाही? 

सहसा कोणत्याही व्यक्तीसाठी नोकरी (Job news) सर्वतोपरी महत्त्वाची असते. तिच्याच बळावर आपल्या जीवनशैलीला (Lifestyle) आणि भविष्याला आकार मिळत असतो हीच नोकरी गमावल्यानंतर मनात काय कोलाहल असेल याची अनेकांनाच कल्पना आहे. 

वाचा : Royal Enfield च्या बाइकचा सोशल मीडियावर धुमाकूळ, तरूणांना पाडतेय भूरळ

हा तरुण मात्र या साऱ्याला अपवाद ठरत आहे. नोकरी गमावली तर काय? आयुष्य तर थांबलेलं नाही अशाच हिशोबानं तो या घटनेकडे सकारात्मकतेनं पाहत आहे. कंपनीतून काढलो गेलोय यापेक्षा कंपनीनं आपल्याला कित्येत चांगल्या गोष्टी मिळवून दिल्या, चांगले अनुभव दिले याचीच जाणीव ठेवत तो कृतज्ञता व्यक्त करताना दिसत आहे. या सकारात्मक दृष्टीकोनानं नेटकरीही भारावले आहेत. 

LinkedIn प्रोफाईलवर दिलेल्या माहितीनुसार यश ट्विटरमध्ये Public Policy Associate म्हणून Twitter India आणि South Asia साठी काम पाहत होता. दोन वर्षांहून अधिक काळ तो केंद्र आणि राज्य शासन, विविध संस्था, नागरी संस्था, परराष्ट्र धोरणं या साऱ्यांशी संलग्न होता.