अरे! 'या' हॉटेलला दरवाजाही नाही आणि छप्परही नाही..

प्रत्येकाच्या मनातला हॉलिडे 

Updated: Jul 11, 2020, 02:28 PM IST
 अरे! 'या' हॉटेलला दरवाजाही नाही आणि छप्परही नाही..

मुंबई : कोरोना पार्श्वभूमीवर सध्या सगळीकडेच लॉकडाऊन आहे. पण तरीही आपलं मन काही लॉकडाऊनमध्ये नाही. खूप गोष्टी आपण आठवतोय ज्यामुळे आपलं मन प्रसन्न होईल. आतापर्यंत आपण केलेला प्रवास हा प्रत्येकासाठीच खास असतो. 

पण आता आम्ही तुम्हाला एक असं हॉटेल दाखवणार आहोत. ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. जिथे भिंती नाहीत कुठेही छप्पर नाही. मोकळं आकाश आणि मोकळी माती, जमीन अनुभवता येणार आहे. 
'अंडर द स्टार्स' अशा रोमँटिक वातावरणात प्रत्येकालाच राहायला आवडेल. या सगळ्या गोष्टी अनुभवायला आपल्याला हिल स्टेशनवरच जाण्याची गरज असते. या रोमांचक अनुभवासाठी लोकं मोकळ्या ठिकाणी टेंट लावतात आणि निसर्गाचा आनंद घेतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Zero Real Estate 2020, Lüsis Suite (1300 m.ü.M.), Walenstadt, performed by @swissheidiland #zerorealestate #lüsisSuite #nullsternspirit #ZREvision #performance #landart #tableauvivant #conceptualart #newluxury #modernbutlerism #modernbutler #ostschweiz #liechtenstein #komplizenschaft #macheting #artonomie #kunstundtourismus #art #subversiveart #unüblich #atelierfürsonderaufgaben #switzerland #ostschweiz #nullsterntheonlystarisyou #nullstern_coverversion #immobilienbefreitehotelzimmer #riklins #frankundpatrikriklin #riklinbrüder #riklinbrothers Foto: @swissheidiland

A post shared by Null Stern Hotel (@nullstern_theonlystarisyou) on

पण स्वित्झरलँडमध्ये 'अंडर द स्टार्स' ची इच्छा पूर्ण करणार एक लक्झरी हॉटेल तयार केलं आहे. या हॉटेलला भिंती पण नाही आणि छप्पर देखील नाही. 'नल स्टर्न हॉटेल' (Null Stern Hotel) असं या लोकप्रिय स्वित्झरलँड हॉटेलचं नाव आहे. हे हॉटेल अतिशय मोकळ्या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे. इथे आलिशान बेड असून सगळ्या सुखवस्तू आहेत.मोकळ्या आकाशाखाली राहण्याचा आनंद आपल्याला घ्यावा लागेल.  

या हॉटेलची सध्या भरपूर चर्चा आहे. लॉकडाऊनमध्ये असाच वेळ घालवा.