Video : तरुणीच्या तोंडात 4 फुटांचा साप घुसला आणि...

Snake In Mouth Viral Video : साप, अजगर  किंवा किंग कोब्रा (King Cobra) घराच्या आजूबाजूला, जंगल परिसरात आणि अचानक रस्त्यावर फना काढून बसलेला व्हिडिओमध्ये आपण अनेक वेळा पाहिलं आहे.

Updated: Nov 15, 2022, 11:11 AM IST
Video : तरुणीच्या तोंडात  4 फुटांचा साप घुसला आणि... title=
Snake in Woman Mouth video viral on social media nmp

Snake in Woman Mouth : साप पाहून अनेकांचा तोंडच पाणी पळून जातं. साप हा खूप विषारी असतो त्यामुळे त्याने दंश केल्यावर माणसाचा जीव जातो. त्यामुळे साप म्हटलं की लोक थरथर कापतात. साप (Snake ), अजगर (python) किंवा किंग कोब्रा (King Cobra) घराच्या आजूबाजूला, जंगल परिसरात आणि अचानक रस्त्यावर फना काढून बसलेला व्हिडिओमध्ये आपण अनेक वेळा पाहिलं आहे. सोशल मीडियावर आपल्याला असे अनेक व्हिडिओ पाहिला मिळतात. पण तुम्ही कधी ऐकलं आहे कोणाच्या तोंडात साप शिरला ते...असाच एक थरकाप उडविणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video viral on social media) झाला आहे. 

अबब! 4 फुटाचा साप जेव्हा तोंडात घुसतो

स्वप्नात कधी विचार केला नसेल असा धक्कादायक प्रकार महिलेसोबत घडला आहे. एक महिला रात्रीच्या वेळी झोप असताना तिच्या तोंडात 4 फूट लांब साप घुसला आणि तो घशात जाऊन बसला. या सापाला बाहेर काढण्यासाठी महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. या भयानक शस्त्रक्रियाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Snake in Woman Mouth video viral on social media nmp) 

अंगावर शहारा आणणारा व्हिडीओ

या थरार व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता डॉक्टर जेव्हा सापाला तोंडातून बाहेर काढतं असतात तेव्हा तो डॉक्टरांवर हल्ला करतो. हा भयानक व्हिडीओ रशियातील असून हा जुना व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. 11 सेकंदाच्या या फुटेजमध्ये डॉक्टर बेशुद्ध झालेल्या महिलेच्या तोंडातून साप बाहेर काढत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

12 नोव्हेंबर रोजी शेअर केलेला हा व्हिडिओ मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर 16 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओला 36.9k पेक्षा जास्त लाईक्स देखील मिळाले आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट सेक्शनमधील लोक घाबरले. एका यूजरने लिहिले की, 'म्हणूनच मी झोपताना ब्लँकेट घालून झोपतो.' दुसर्‍या यूजरने लिहिले की, 'हे वेडे आहे, मला आश्चर्य वाटते की एवढ्या गाढ झोपेत कोणी कसे झोपू शकते आणि कोणाच्या तोंडात साप घुसला.'