फिल्मी स्टाइल थरार...; आईच्या बॉयफ्रेंडला संपवले, सोशल मीडिया स्टारनेच रचला होता जीवघेणा कट

Girl Killed Mother Boyfriend: सोशल मीडिया स्टारने तिच्याच आईच्या प्रियकराची हत्या घडवून आणली आहे. या प्रकराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 8, 2023, 03:25 PM IST
फिल्मी स्टाइल थरार...; आईच्या बॉयफ्रेंडला संपवले, सोशल मीडिया स्टारनेच रचला होता जीवघेणा कट title=
फोटो सौजन्यः सोशल मीडिया

Trending News In Marathi:  एका सोशल मीडिया स्टारने आपल्याच आईच्या प्रियकराची हत्या केली आहे. ही तरुणी सोशल मीडियावर ब्युटी आणि लाइफस्टाइल क्रिएटर आहे. तिचे नाव महक बुखारी असं असून तिने तिच्या आईच्या 21 वर्षीय प्रियकराचा व त्याच्या मित्राचा अपघात घडवून आणला आहे. यात दोघांचाही दुर्देवी मृत्यू झाला असून हे प्रकरण फ्रेबुवारी 2022मधील आहे. तर, आता आरोपी तरुणीला दोषी ठरवण्यात आले आहे. 

व्हिडिओ व्हायरल केल्याची धमकी

न्यूयॉर्क पोस्टच्या बातमीनुसार, साकिब हुसैन आणि हाशिम इजाजुद्दीन यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हुसेनने महकची आई अंसरीन बुखारीला ब्लॅकमेल केले होते. तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. तसंच, दोघांच्या नात्याबद्दल सगळीकडे जाहिर करीन, अशी धमकीही त्याने दिली. हुसैनच्या धमकीला घाबरुन अंसरीनला हे नाते संपवण्याचे होते.

प्रियकरानेच केले ब्लॅकमेल

अंसरीनने तिच्या मुलीला म्हणजेच महकला घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितले. तेव्हा महकने तिला मदत करण्याचा सल्ला दिला. तिने व्हॉट्सपवर मेसेज करत, मी लवकरच त्यांना पकडून देईन आणि तो दिवस लवकरच येईल, असं म्हटलं होतं. त्यानंतर महकने व्यवस्थित प्लान करत. सुरुवातीला तिने हुसैनला तोंड बंद ठेवण्याचे 3000 डॉलर देण्याची ऑफर ठेवली. 

मुलीनेच रचला जीवघेणा कट

हुसैनने महकची ऑफर स्वीकारल्यानंतर तो त्याच्या मित्रांसह पैसे घेण्यासाठी निघाला. तेव्हाच दोन गाड्या त्यंचा पाठलाग करत असल्याचे जाणवले. त्यानंतर धोका ओळखून त्याने पोलिसांना फोन केला तसंच, त्याच्या जीवाला धोका असून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला गेला. त्याचवेळी त्याच्या कारचा अपघात झाला आणि त्यात दोघांचा मृत्यू झाला. 

कोर्टाने ठरवले दोषी

गाडी चालवणाऱ्या 29 वर्षांचे रेखान कारवान आणि 23 वर्षांच्या रइस जमाल याला हत्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. त्याचबरोबर, षडयंत्रात साथ देणाऱ्या 23 वर्षीय तनाशा अख्तर आणि 28 वर्षांच्या अमीर जमाल आणि 23 वर्षांच्या सनफ गुलामुस्तफाला दोषी ठरवण्यात आले आहे. हे सगळेजण हुसैनच्या गाडीचा पाठिलाग करणाऱ्या कारमध्ये बसले होते.