हे तर काहीच नाही! NASA च्या स्पेस स्टेशनहून दुप्पट आकाराचं स्पेस स्टेशन बनवणार चीन

Space news : NASA ला टक्कर देण्यासाठी चीन सज्ज. अवकाशातही चीनची इतर देशांशी स्पर्धा सुरुच. त्यांच्या या निर्णयाचा नेमका परिणाम काय असेल? पाहा.   

सायली पाटील | Updated: Oct 5, 2023, 01:03 PM IST
हे तर काहीच नाही! NASA च्या स्पेस स्टेशनहून दुप्पट आकाराचं स्पेस स्टेशन बनवणार चीन title=
Space news China to double size of space station than NASA latest update

Space news : NASA आणि जगातील इतर देशांच्या अंतराळ संशोधन संस्थांकडून मागील काही वर्षांमध्ये अतिशय कमी वेळाच्या अंतरानं अवकाश मोहिमा राबवण्यात आल्या. विविध ग्रह, विविध लघुग्रह,  तारे, अवकाशातील कक्षा अशा अनेक गोष्टींबाबतचे खुलासे यामुळं झाले आणि फार सोप्या पद्धतीनं अवकाशातील रहत्यांचा वास्तवदर्शी उलगडा सर्वांपुढं झाला. भारतासह जगातील इतरही देशांचं योगदान यामध्ये पाहायला मिळालं. पण, इथंही आता चीन आपण किती सरस हे दाखवण्यासाठी पुढे सरसावताना दिसत आहे. 

येत्या तीन वर्षांमध्ये चीनकडून त्यांचं स्पेस स्टेशन आणखी मोठं करण्यात येणार असून, त्याची व्याप्ती 6 मॉड्यूलइतकी असेल. जिथं जगभरातील (इतर देशांतील) अंतराळवीरांना नासाव्यतिरिक्त दुसरा एक पर्याय म्हणून या स्पेस स्टेशनचा वापर करता येईल. नासाच्या स्पेस स्टेशनचं आयुर्मान पूर्ण होण्याच्या सुमारास चीनचं हे स्पेस स्टेशन पृथ्वीभोवतीच्या मोहिमांसाठी मदतीचं ठरेल असं म्हटलं जात आहे. 

हेसुद्धा वाचा : अंतराळात फिरत असलेले इंटरनॅशन स्पेस सेंटर पृथ्वीवरुन उघड्या डोळ्यांनी पाहण्याची संधी

 

चीन सर्व देशांपासून सरस असल्याचं दाखवण्यासाठी हे करतंय की त्यामागं त्यांचा आणखी काही हेतू आहे याबाबतची स्पष्टोक्ती होऊ शकलेली नाही. पण, प्राथमिक माहितीनुसार चीनच्या या स्पेस स्टेशनचं आयुर्मान 15 वर्षे असणार आहे. अझरबैझानमधील बाकू येथे झालेल्या 74 व्या  International Astronautical Congress मध्ये  China Academy of Space Technology (CAST)कडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. 

स्पेस स्टेशनविषयी आणखी थोडी माहिती... 

2022 पासूनच चीनचं Tiangong नावाचं हे स्पेस स्टेशन पूर्ण क्षमतेनं सुरु झालं. ज्यामध्ये जास्तीत जास्त तीन अंतराळवीरांना आसरा मिळू शकतो. पृथ्वीच्या कक्षेपासून दूर साधारण 280 मैल दूर हे स्पेस स्टेशन असल्याचं सांगण्यात येतं. सध्या चीनच्या या स्पेस स्टेशनची क्षमता सात अंतराळवीरांसाठी पूरक असणाऱ्या ISS हून अवघी 40 टक्के आहे. ISS अवकाशात गेल्या 20 वर्षांपासून असून 2030 मध्ये ते बंद होणार असल्याचं सांगितलं जात आहे.