मुंबई : राज्यात मराठा मोर्चाला विक्रमी पाठिंबा मिळाल्याचे चित्र दिसून आले. आतापर्यंत जिल्हापातळीवर मोर्चे काढण्यात आलेत. आता शेवटचा मुंबईत विराट मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आलाय. २५ लाखांची उपस्थिती असेल असे नियोजन करण्यात आलेय. या मराठा मोर्चाला पाकिस्तानमधून पाठिंबा मिळालाय.
मराठा आरक्षणाला थेट पाकिस्तानमधून पाठिंबा मिळालाय. फेसबुकवर पाठिंब्याची पोस्ट टाकण्यात आलेय. बलुचिस्तानमध्ये असलेल्या maratha tribeने मराठा क्रांती मोर्चाला पाठींबा दिला आहे. मराठा ट्राईबच्या फेसबुक पेजवर पाठींबा देणारी पोस्ट टाकण्यात आली आहे.
मराठा समाजाला नोकरी, शिक्षणात आरक्षण देण्यासाठी पाठिंबा देण्यात आला आहे. पानीपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर मराठ्यांना अफगाणिस्तानमध्ये नेले जात होते. पण ते शक्य झालं नाही, त्यामुळे त्यांना बलुचिस्तानात ठेवण्यात आले. तिथं त्यांचं धर्मांतर झालं. पण त्यांनी त्यांच्या नावात मराठा नाव अजूनही जोडलेलं आहे. मराठा असण्याचा त्यांना अभिमान आहे, अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाकिस्तानात मराठ्यांचे हक्क मिळत आहेत. मात्र, भारतात मराठ्यांना त्यांचे हक्क का दिले जात नाही, असा सवाल या मराठा ट्राईबच्या फेसबुक पेजवर विचारण्यात आलाय.