नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटातही पाकिस्तान सतत दहशतवाद्यांना मदत करत आहे. पाकिस्तान सतत जम्मू आणि कश्मीरमध्ये अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. लश्कर आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून तो दहशतवादी हल्ल्याचा कट रचत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या 10 दिवसात भारतात जवानांवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी पाकिस्तान एलओसीच्या मार्गे दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी मदत करत आहे.
सूत्रांचे माहितीनुसार, एलओसीच्या भागात लष्कर, हिज्बुल आणि अल-बद्रचे अनेक दहशतवादी जमले आहेत. दहशतवाद्यांनी लॉन्च पॅड देखील बनवला आहे. लश्करचे 16 दहशतवादी पीओकेमधून भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार लश्कर आणि अल बद्र 11 दहशतवादी 2 वेगळ्या ग्रुप्समध्ये तंगधार सेक्टरच्या बाजुने भारतात घुसखोरी करु शकतात. लश्करचे 5 दहशतवादी दुसऱ्या ठिकाणाहून घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरेज सेक्टरमधून 12 हिज्बुलच्या दहशतवाद्यांचा एक ग्रुप भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. लश्करच्या आणखी 20 दहशतवाद्यांचा एक गट तंगदार पासून भारतीय हद्दीत घुसण्याच्या प्रयत्नात आहे.
सूत्रांचा असा दावा आहे की, स्मगलिंग करणाऱ्या एका ग्रुपने तंगधार भागात रेकी देखील केली आहे. पैसे आणि हत्यारांची कमी असलेल्या दहशतवाद्यांना आयएसआयने मदत केली आहे. हत्यार आणि ड्रग्ससाठी वेगळा रस्ता शोधत असलेल्या तस्करांनी संरक्षण दलाच्या तैनातीबद्दल देखील रेकी केली आहे.
आयएसआयच्या मदतीने लश्कर आणि जैशच्या 3 दहशतवादी संघटनांनी स्थानिक नावं ठेवली आहेत. टीआरएफ, टीएमआय आणि जगवा-ए-हिंदला देखील पाकिस्तानने अॅक्टिव केलं आहे.