कोणत्याही पदवी विना नोकरी, टेस्ला देणार 10 हजार रोजगार

टेस्लाचे सीईओ (CEO) एलोन मस्क यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर जाहीर केले आहे की, 2022 पर्यंत ऑस्टिन जवळील टेस्ला मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये 10 हजाराहून अधिक लोकांना नोकरीवर घेतले जाईल.

Updated: Apr 6, 2021, 06:58 PM IST
कोणत्याही पदवी विना नोकरी, टेस्ला देणार 10 हजार रोजगार title=

मुंबई : तुम्हाला जर दुसऱ्या देशात नोकरी करण्याची इच्छा आहे. परंतु कोणतीही पदवी नसल्याने तुमचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही असा तुम्ही विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे. आता तुम्हाला विना पदवी देशाबाहेर काम करणायाची संधी चालून आली आहे आणि ते ही टेस्ला सारख्या मोठ्या कंपनीसाठी. यासाठी कंपनी इच्छा शक्ती आणि टॅलेन्टेड माणसांच्या शोधात आहे. जर तुमच्याकडे काही करुन दाखवण्याची धमक असेल, तर तुम्ही नक्कीच इथे काम करु शकता.

टेस्लाचे सीईओ (CEO) एलोन मस्क यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर जाहीर केले आहे की, 2022 पर्यंत ऑस्टिन जवळील टेस्ला मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये 10 हजाराहून अधिक लोकांना नोकरीवर घेतले जाईल. यामध्ये चांगली गोष्ट अशी आहे की, या लोकप्रिय ब्रँड सोबत काम करण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या कोणत्याही पदवीची गरज लागणार नाही.

हायस्कूलनंतर विद्यार्थ्यांना टेस्लाच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये नोकरीसाठी अर्ज करु शकतात. एलोन मस्क यांनी टेस्लाचे ओनर ऑस्टिनला कोट करत ही बातमी शेअर केली आहे. एलोन मस्क यांनी कंपनीचे कंस्ट्रक्शनचे काम कंपनीच्या नवीन पद्धतीने वेगवान गतीने सुरू असल्याचे जुलैमध्ये जाहीर केले होते.

एलोन मस्क यांनी टेक्सासमध्ये नोकरी करण्याचे फायदे सांगितले

एलोन मस्क यांनी आपल्या ट्विटद्वारे नवीन गीगा टेक्सासमध्ये काम केल्याने होण्याचे फायदे देखील सांगितले. त्यांनी सांगितले की, कामाची जागा एयरपोर्टपासून 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. जे शहरापासून  पाच मिनिटांच्या अंतरावर कोलोरॅडो नदीच्या तटावर स्थित आहे. या व्यतिरिक्त एलोन मस्क यांनी कोणतेही तपशील दिले नाही.

मंगळवारी एलोन मस्क यांनी लोकांना आपली aerospace कंपनी SpaceX, जी साऊथ टेक्सासमध्ये आहे त्याला जॅाईन करण्यासाठी आग्रड केला आहे. तसेच तुमच्या मित्रांना असे करण्यास प्रोत्साहित करावे असे आवाहन केले आहे.

कंपनीचे रिक्रूटिंग मॅनेजर क्रिस राले म्हणाले की, "कंपनीने ऑस्टिन कम्युनिटी कॉलेज, ह्यूस्टन-टिलॅाटसन विद्यापीठ, टेक्सास विद्यापीठ आणि डेल व्हॅले इंडिपेन्डेट स्कूल यांच्याशी संपर्क साधला आहे." ते पुढे म्हणाले की, कंपनी त्या विद्यार्थ्यांना रिक्रृट करण्याचा विचार करत आहे, जे विद्यार्थी आपले शिक्षण सुरू ठेऊन टेस्लामधून आपले करिअर सुरू करण्याचा विचार करत आहेत.

कंपनीने हे देखील स्पष्ट केले आहे की, बाहेरील मॅन्युफॅक्चरिंगमधून येणाऱ्या, उत्कट भावना असलेल्या आणि ज्यांना बदल घडवण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी येथे बर्‍याच ही चांगली संधी आहे. टेस्ला जगातल्या टॅलेन्टेड लोकांना कामावर घेऊ इच्छीत आहे.