'लस' आली आता कोरोना संपणार का?

 कोरोना लस (Corona vaccine) आल्यामुळे जगभरात आनंदाचा वातावरण आहे. पण चीनमधल्या वुहान व्हायरसचा (Wuhan virus)अंत लसीकरणामुळं होऊ शकत नाही, असे तज्ज्ञ मंडळी सांगत आहेत. 

Updated: Dec 15, 2020, 07:22 PM IST
'लस' आली आता कोरोना संपणार का?  title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोना लस (Corona vaccine) आल्यामुळे जगभरात आनंदाचा वातावरण आहे. पण चीनमधल्या वुहान व्हायरसचा (Wuhan virus)अंत लसीकरणामुळं होऊ शकत नाही, असे तज्ज्ञ मंडळी सांगत आहेत. ते असं का म्हणत आहे. त्याचे काय आहे खरं कारण, हा एक रिपोर्ट. दरम्यान, अद्याप कोविड १९चं व्यापक लसीकरण (Covid vaccine) झालेले नाही. त्याचा किती उपयोग होईल, याचीही शंका आहे. तशात आता ब्रिटनमध्ये कोरोनाचा (coronavirus) नवा प्रकार समोर आला आहे. 

हे प्रश्न सध्या अवघ्या जगाला पडले आहेत. कोरोना लस येणार असल्याने सुटकेचा निःश्वास सोडणार असाल, तर सावधान. कारण कोरोना लसीकरणाचा काम फारच आव्हानात्मक असणाराय. वुहान व्हायरसपासून सुटका होणं, एवढं सोप्पं असणार नाहीय, असं विशेषज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

आतापर्यंत तीन 'लस'ना मान्यता मिळाली. तर आणखी दोन 'लस' मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्याशिवाय इतर अनेक 'लस'ची तिसऱ्या टप्प्यातली चाचणी सुरू आहे. लस टोचल्यानंतर कोरोना बरा होईल, असं अनेकांना वाटते. पण 'लस'मुळे कोरोनाचा खात्मा होणार नाही, असं तज्ज्ञ सांगत आहेत.

इतिहासात असे अनेक व्हायरस आहेत, ज्यांचा अंत 'लस'मुळे झालेला नाही. १८१७ ते १८२४ या कालावधीत फ्रान्समध्ये प्लेगची साथ आली होती. १८५५ ते १९६० दरम्यान चीनमध्ये प्लेग सक्रीय होता. १९१८ ते १९२० या काळात स्पॅनिश फ्लूचा कहर होता. तर १९५७ मध्ये हाँगकाँगमध्ये एशियन फ्लूने धुमाकूळ घातला. तर कॉलराची साथ अजून जगभरात आहे. या सगळ्या रोगांवर 'लस' आल्या. पण रोगांचा प्रादुर्भाव कायम आहे. ४० वर्षांत एचआयव्हीवर देखील अजून रामबाण उपाय सापडलेला नाही.
 
त्यामुळे चीनमधला वुहान व्हायरस लसीकरणानंतर लगेच नष्ट होईल, असं होणार नाही. त्यामुळं नागरिकांना आता स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी लागणार आहे. आपल्या लाइफ स्टाईलमध्ये बदल करणे, हेच फायदेशीर ठरणार आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर

अद्याप कोविड १९चे व्यापक लसीकरण झालेले नाही. त्याचा किती उपयोग होईल, याचीही शंका आहे. तशात आता ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आला आहे. दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये 'सार्सकोव टू' हा नवा  कोरोना व्हायरस आढळून आलाय. या व्हाररसचे एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्याची माहिती संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोमवारी देण्यात आली. 

कोविड-१९ व्हायरसपेक्षा सार्सकोव टूचा फैलावही अधिक वेगानं होत असल्याची धक्कादायक माहिती ब्रिटनचे आरोग्य राज्यमंत्री मॅट हँकॉक यांनी दिली. कारण केंट काऊंटीमध्ये गेल्या आठवड्यातच याचा पहिला रूग्ण आढळून आला होता. शिवाय सध्या कोविड १९साठी शोधली गेलेली लस सार्सकोव टूवर किती परिणामकारक असेल, याचीही शंका आहे. ब्रिटनने याबाबत जागतिक आरोग्य संघटनेला माहिती दिली आहे.