भूतानचे राजा आणि त्यांच्या वडिलांनी CDS बिपिन रावत यांना वाहिली श्रद्धांजली

तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात भारताने आपला पहिले सीडीएस गमावले. फक्त देशातच नाही तर जगभरात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Updated: Dec 10, 2021, 10:01 PM IST
भूतानचे राजा आणि त्यांच्या वडिलांनी CDS बिपिन रावत यांना वाहिली श्रद्धांजली title=

नवी दिल्ली : भूतानचे राजे जिग्मे खेसर वांगचुक यांनी गुरुवारी भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका आणि हेलिकॉप्टर अपघातात मरण पावलेल्या 11 जणांना श्रद्धांजली वाहिली. 

तामिळनाडूमध्ये बुधवारी हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले होते. ज्यामध्ये भारताने आपले 13 कतृत्वान जवान गमावले.

भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, भूतानच्या राजाचे वडील जिग्मे सिंगे वांगचुक यांनीही जनरल रावत, त्यांची पत्नी आणि अन्य 11 जणांना श्रद्धांजली वाहिली. 

India pays tributes to Gen Bipin Rawat as nostalgic posts pour in on social  media

भारतीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, 'भूतानचे राजा आणि त्यांच्या वडिलांनी शहिदांचे कुटुंबीय, भारतातील लोक आणि सरकार यांच्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या कारकिर्दीत जनरल रावत यांनी अनेक वेळा भूतानला भेट दिली होती आणि देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाशी त्यांचे जवळचे संबंध होते.'