प्रसिद्ध Tik Tok स्टारचे निधन, चाहत्यांना बसला मोठा धक्का

Canada Tik Tok Star Dies: शोककळा! प्रसिद्ध Tik Tok स्टारचे अचानक निधन, चाहत्यांना मोठा धक्का 

Updated: Dec 3, 2022, 11:12 PM IST
 प्रसिद्ध Tik Tok स्टारचे निधन, चाहत्यांना बसला मोठा धक्का  title=

Canada Tik Tok Star Dies: बॉलिवू़ड अभिनेत्या-अभिनेत्रींसह आता सोशल मीडिया इन्फ्लुन्सरचा मोठा चाहता वर्ग बनत चालला आहे. अशाच एका चाहत्या वर्गाला मोठा धक्का बसला आहे. कारण एका प्रसिद्ध टिकटोक स्टारचा (Tik Tok Star) निधन झाल्याची घटना घडली आहे. या टिकटोक स्टारच्या कुटूंबियांनी या संबंधित माहिती सोशल मीडियावर दिली आहे. या घटनेने फॅन्स शॉकमध्ये आहे. 

कोण आहे ही टिकटोक स्टार?

भारतीय वंशाच्या कॅनेडियन टिकटोक स्टार (Tik Tok Star) मेघा ठाकूरचे (Megha Thakur) निधन झाल्याची घटना घडलीय. तिच्या मृत्यूनंतर  आई-वडिलांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून यासंबंधित माहिती दिली आहे.  

हे ही वाचा : शाहरूख सोबत झळकलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर आली वाईट वेळ

मेघा ठाकूर (Megha Thakur) केवळ 21 वर्षांची होती. सोशल मीडियावर ती तिच्या व्हिडिओंमुळे खूप प्रसिद्ध होती. मेघा (Megha Thakur) सोशल मीडियावर बॉडी पॉझिटिव्हिटीचा प्रचार करण्यासाठी ओळखली जात होती. ती अनेकदा तिच्या डान्सचे व्हिडिओ शेअर करत असे. टिकटॉकवर (Tik Tok Star) तिचे 930 हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. 

पोस्टमध्ये काय? 

मेघाच्या (Megha Thakur) आई-वडिलांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून तिच्या निधनाची माहिती दिली आहे. पोस्टमध्ये ते लिहतात की, "आम्ही जड अंतःकरणाने घोषणा करतो की आमच्या जीवनाचा प्रकाश, आमची दयाळू, काळजी घेणारी आणि सुंदर मुलगी मेघा ठाकूरचे 24 नोव्हेंबर 2022 च्या पहाटे अचानक आणि अनपेक्षितपणे निधन झाले आहे. 

या पोस्टमध्ये ते त्यांच्या मुलीबाबत सांगतात की,  "मेघा एक आत्मविश्वासू आणि स्वतंत्र तरुणी होती. तिची खूप आठवण येईल. तिचे तिच्या चाहत्यांवर खूप प्रेम होते आणि तिच्या निधनाबद्दल तुम्हाला कळावे अशी तिची इच्छा होती. यावेळी आम्ही मेघासाठी (Megha Thakur) तुमचे आशीर्वाद मागतो. तिच्या पुढच्या प्रवासात तुमचे विचार आणि प्रार्थना तिच्या सोबत असतील.” असे तिचे पालक म्हणाले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Megha (@meghaminnd)

दरम्यान ही दुःखद बातमी मिळाल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तर या पोस्टवर आता मेघा ठाकूरला (Megha Thakur) तिचे श्रद्धांजली वाहत आहेत.