Trending News: लहान मुलांना सांभाळणे हे खूप कष्टाचे काम असते. डोळ्यात तेल ठेवून मुलांकडे लक्ष द्यावे लागते. एका ठराविक वयानंतर मुलं जे दिसेल त्या वस्तूकडे धावतात व ती तोंडात घालतात. त्यामुळं मुलांकडे लक्ष ठेवणे ही जबाबदारीची गोष्ट असते. गेल्या काहि दिवसांपासून मुलांसोबत घडणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कुटुंबाच्या निष्काळजीपणामुळं कधीकधी मुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. एक अशीच भयानक घटना 2 वर्षांच्या मुलासोबत घडली आहे. अजाणतेपणी एका मुलाने इंजेक्शनच्या ८ सुया गिळल्या आहेत.
पूरू या देशातील उत्तरपूर्व परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे. मुलगा खेळत असतानाच त्याने मेडिकलसाठी वापरात येणाऱ्या इंजेक्शनच्या ८ सूया गिळल्या आहेत. मुलाच्या आईचे लक्ष नसतानाच ही घटना घडली आहे. दोन वर्षांच्या चिमुकल्यासोबत घडलेली ही घटना ऐकून डॉक्टरही चकित झाले. त्यांनी ताबोडतोब मुलावर शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. डॉक्टरांच्या उपचारांमुळं चिमुकल्याचा जीव वाचला आहे.
या घटनेविषयी डॉक्टर इरफान सालजार यांनी म्हटलं आहे की, आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये त्याच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पोटावर चीरा मारल्यानंतर आतमध्ये लोखंडासारखी काही वस्तू दिसत होती. जेव्हा डॉक्टरांनी ते बाहेर काढले तेव्हा सुई असल्याचे लक्षात आले. डॉक्टरांनी एक एक करुन तब्बल आठ सुया बाहेर काढल्या आहेत. 2 वर्षांच्या चिमुकल्याच्या पोटातून आठ सूया बाहेर निघाल्याने डॉक्टरही हादरले.
स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या पोटात सापडलेल्या सुयांनी हा शेतातील प्राण्यांना लस देण्यात येते. या मुलाची आई शेतात काम करते. मुलाची आई शेतात काम करत असताना त्याने खेळता खेळता या सूया गिळल्या असतील, असं त्याच्या आईचे म्हणणे आहे. या मुलाचे नाव अजून समोर आले नसून त्याचे कुटुंब राजधानी लीमापासून 62 कीमी दूर असलेल्या ताराटोपो कृषी क्षेत्रात राहतात.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशननंतर या मुलाची प्रकृती आता धोक्याच्या बाहेर असून त्याची योग्य काळजी घेतली जात आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी अमेरिकेतूनही अशीच एक घटना समोर आली होती. 52 वर्षीय एका महिलेने एअरपॉड गिळले होते. व्हिटॅमिनची गोळी समजून या महिलेने चक्क नवऱ्याचे एअरपॉड गिळले होते.