सर्वाधिक पगार देणाऱ्या 5 कंपन्या!

कारकिर्दीची सुरुवात असो किंवा प्रमोशन प्रत्येकालाचा सर्वोत्तम पगाराची अपेक्षा असते.

Updated: Oct 7, 2018, 11:06 PM IST
सर्वाधिक पगार देणाऱ्या 5 कंपन्या! title=

मुंबई : कारकिर्दीची सुरुवात असो किंवा प्रमोशन प्रत्येकालाचा सर्वोत्तम पगाराची अपेक्षा असते. पण बहुतेक वेळा ही अपेक्षा पूर्ण होत नाही आणि मग कर्मचाऱ्यांना तडजोड करावी लागते. पण जगभरामध्ये अशाही कंपन्या आहेत जिकडे कर्मचाऱ्याला त्याच्या पगारासाठी कधीच आणि कोणतीच तडजोड करावी लागत नाही. रिसर्च कंपनी कम्पेरेबलीनं 10 हजार कंपनी आणि 50 लाख कर्मचाऱ्यांच्या रिव्ह्यूचा आधार घेऊन एक यादी बनवली आहे. या यादीमध्ये जगातल्या सर्वाधिक पगार देणाऱ्या कंपन्यांची नावं देण्यात आली आहे. ही यादी सप्टेंबर 2017 ते सप्टेंबर 2018 च्या रेटिंगवर आधारीत आहे.

google

जगातलं सर्वात मोठं सर्च इंजिन म्हणून ओळख असलेलं गुगल या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. गुगलचं हेड ऑफिस कॅलिफोर्नियाच्या माऊंटन व्ह्यूमध्ये आहे. गुगलच्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पगार मिळतो. या कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार 1.19 कोटी रुपये आहे. पगारासाठी आम्हाला कंपनीसोबत घासाघीस करावी लागत नाही, अशी प्रतिक्रिया गुगलच्या कर्मचाऱ्यांनी दिली. 

facebook

सोशल मीडियातली दिग्गज कंपनी फेसबूक या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. फेसबूकमध्ये प्रॉडक्ट डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक 1.15 कोटी रुपये पगार आहे. पगारासोबतच फेसबूक कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेंटिव्हही देतं.

salesforce

सेल्सफोर्स ही एक क्लाऊड कंप्यूटिंग कंपनी आहे. सर्वाधिक पगार देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत सेल्सफोर्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. सेल्सफोर्सच्या बिजनेस डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये सरासरी 1.13 कोटी रुपये पगार मिळतो. याच कंपनीनं काही दिवसांपूर्वी टाईम मॅग्झिन विकत घेतलं होतं. पगारवाढीसाठी कोणालाच प्रश्न विचारावे लागत नाहीत कारण कंपनी चांगली पगारवाढ करते, अशी प्रतिक्रिया सेल्सफोर्सच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

microsoft

अमेरिकेची टेक्नोलॉजी कंपनी मायक्रोसॉफ्टच्या प्रॉडक्ट डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांना 1.12 कोटी रुपये पगार मिळतो. सर्वाधिक पगार असणाऱ्या कंपन्यांच्या यादीत मायक्रोसॉफ्ट चौथ्या क्रमांकावर आहे. कर्मचारी किती तास काम करतो यापेक्षा तो काय काम करतो यावर कंपनी लक्ष देते.

netflix

अमेरिकन मीडिया सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी नेटफ्लिक्सची स्थापना रीड हेस्टिंग्सनी केली होती. नेटफ्लिक्सचं हेडक्वार्टर कॅलिफोर्नियाला आहे. नेटफ्लिक्सच्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांना 1.12 कोटी रुपये पगार मिळतो.