बालाकोट पुन्हा सक्रीय, भारतावर हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण

जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी संघटनेचा तळ असणारा बालाकोट पुन्हा एकदा सक्रीय झाला  आहे.

Updated: Feb 7, 2020, 07:44 PM IST
बालाकोट पुन्हा सक्रीय, भारतावर हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : पाकिस्तानला भारताने धडा शिकवला असताना पुन्हा एकादा जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी संघटनेचा तळ असणारा बालाकोट पुन्हा एकदा सक्रीय झाला  आहे. याआधी भारताने बालाकोट येथील दहशतवादी तळ सर्जिकल स्ट्राईक करत नष्ट केले होते. मात्र, पाकिस्तानकडून पुन्हा दहशतवादाला खतपाणी घालण्यात येत आहे. भारतावर हल्ला करण्यासाठी २७ दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणेकडून प्राप्त झाली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला होता. या हल्यात बालाकोट पूर्णपणे नष्ट झाला होते, अशी माहिती संरक्षण विभागाकडून देण्यात आली होती. मात्र गुप्ततर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाकोट तळ पुन्हा एकदा भारतावर हल्ला करण्यासाठी सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याला भारताकडून प्रत्युत्तर मिळेल, अशी चर्चा सुरु झाली आहे. 

पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक घडवून आणला. यावेळी बालाकोटमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले होते. पुन्हा कधी भारतावर अशा पद्धतीने हल्ला होऊ नये यासाठीच पाकिस्तानला हा धडा शिकवण्यात आला होता. मात्र, पाकिस्तानची सवय काही केल्या जात नसल्याचे या प्रशिक्षणानंतर पुन्हा दिसून येत आहे. मसूद अझहरचा मुलगा युसूफ अझहर सध्या जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या असून भारतावर हल्ला करण्यासाठी तो दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहे, अशी गुप्तचर विभागाची माहिती आहे.

बालाकोट येथे जे प्रशिक्षण तळ पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. त्यात २७ पैकी आठ दहशतवादी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील आहेत. त्यांना पंजाब, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील दहशतवादी प्रशिक्षण देत आहेत.  हे प्रशिक्षण या आठवड्यात पूर्ण होईल. यानंतर दहशतवादी भारतात घुसखोरी कऱण्याचा प्रयत्न करतील. भारताने जेव्हा सर्जिकल स्ट्राइक केला तेव्हा बालाकोटमध्ये ३०० दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते. भारतीय लष्कराने हे दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले होते. त्यानंतर पुन्हा हे तळ उभारण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.