Trending News : एका महिलेने सुपरसाईज बेबीला (Supersize baby) जन्म दिला असून नवजात बाळाचं (Born Baby) वजन आणि उंची पाहून डॉक्टरही हैराण झाले आहेत. नवजात बाळाची आणि आईची प्रकृती उत्तम असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ब्राझीलच्या अॅमेझोनस (Brazil, Amazonas) राज्यातील ही घटना आहे. राज्यात आतापर्यंत जन्मलेल्या बाळांमध्ये हे सर्वात जास्त वजनाचं बाळ (Overweight Baby) असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
सुपरसाईज बेबीचा जन्म
18 जानेवारीला Amazonas राज्यातील Parintins मधल्या Hospital Padre Colombo इथं महिलेची प्रसूती झाली. नवजात बाळाचं वजन तब्बल 7 किलो इतकं, तर उंची साधारण दोन फूट इतकी आहे. डॉक्टरांनी बाळ सुपरसाईज बेबी असल्याचं म्हटलं आहे. अॅमेझोनस राज्यात जन्मलेलं हे सर्वात जास्त वजन असलेलं बाळ आहे. याआधी जन्मलेल्या बाळाचं साडे सहा किलो वजन आणि 1.8 फूट उंच होती.
मुलाच्या आईचं नवा क्लिडिअन सँटोस असं असून ती 37 वर्षांची आहे. क्लिजिअर गरोदर (Pregnant) होती आणि नियमीत तपासणीसाठी रुग्णालयात गेली होती. पण तपासणीदरम्यान डॉक्टरांनी तिला सिझरिंग करण्याचा सल्ला दिला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी क्लिडिअनने मुलाला जन्म दिला. आपल्या मुलाचं नाव तीने एंगर्सन असं ठेवलं आहे.
जन्मताच एंगर्सनची उंची 59 सेंटीमीटर इतकी आहे. म्हणजे साधारण नवजात बाळाच्या उंचीपेक्षा तब्बल आठ सेंटिमीटरने उंची जास्त आहे. तर नवजात एंगर्सनचं वजन 1 वर्षांच्या मुला इतकं आहे. त्याच्या आई-वडिलांनी त्याच्यासाठी जे कपडे खरेदी केले आहेत, तेही त्याला होत नाहीत. एंगर्सनची आई क्लिडिअन हिला आधी चार मुलं आहेत.
गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या नोंदीनुसार जगातील सर्वात वजनदार बाळ 1955 इटलीत जन्माला आलं होतं. या बाळाचं वजन 10.2 किलो इतकं होतं.
हे ही वाचा : 54 वर्षांपूर्वी चंद्रावर पाऊल, 93 व्या वर्षी लग्न... लोकांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
जगातील सर्वात लहान बाळ
जगातील सर्वात कमी वजनाच्या बाळाचा (Low Weight Baby) जन्म 2021 मध्ये सिंगापूरमध्ये झाला. सिंगापूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पीटलमध्ये जन्मलेल्या या बाळाचं वजन केवळ 212 ग्रॅम इतकं होतं. क्वेक यू झुआन असं या मुलीचं नाव आहे. एका सफरचंदाच्या वजनाइतकं क्वेक यू झुआनचं वजन होतं. क्वेक यू झुआन ही 4 महिने प्री मॅच्युअर होती आणि जन्माच्या वेळी तिची उंची केवळ 24 सेंटीमीटर इतकी होती. क्वेक यू झुआनला कमी वजन आणि उंचीमुळे अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. त्यानतंर तब्बल 13 महिन्यांनी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
याआधी 2018 मध्ये जन्मलेल्या एका मुलीच्या नावावर जगातील सर्वात कमी वजनाचा रेकॉर्ड होता. जन्मावेळी या बाळाचं वजन 245 ग्रॅम इतकं होतं.