धक्कादायक! भर रस्त्यात तरुणाने फ्लिप मारला आणि...; पुढे काय झालं पाहा हा Video

अगदी आपल्या जीव धोक्यात घालून वेगवेगळे स्टंट करतानाचे व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत.

Updated: Aug 8, 2022, 01:42 PM IST
धक्कादायक! भर रस्त्यात तरुणाने फ्लिप मारला आणि...; पुढे काय झालं पाहा हा Video title=
trending video boy fell down on road during stunt shoot Stunt Video viral video on social media in maratha

Stunt Video: आजकालची तरुण पिढी ही सोशल मीडियावर जास्त जास्त वेळ घालवते. या र्व्हच्युअल जगाने या तरुण पिढीला वेड लावलं आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी यूजर्स कुठल्याही थराला जात आहे. अगदी आपल्या जीव धोक्यात घालून वेगवेगळे स्टंट करतानाचे व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. असे धोकादायक स्टंट करताना मुलांना दुखापत झालेल्या घटनाही आपण पाहिल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 
जो पाहून तुम्हाला धक्काच बसेल. 

हा मुर्खपणा तुम्ही करु नका!

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चारही दिशाने गाड्यांची ये-जा सुरु आहे. अशात एक तरुण सगळ्यांचं लक्ष वेधण्यासाठी रस्त्याच्या मधोमध स्टंट करताना तुम्ही पाहू शकता. या व्हिडीमध्ये तुम्ही पाहू शकता वर्दळीच्या रस्त्यावर हा तरुण फ्लिप करताना दिसत आहे. रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या लोकांचे लक्ष वेधण्यात तो यशस्वी होतो. हा तरुण जेव्हा फ्लिप मारतो तेव्हा रस्त्यावरुन जाणारी एक तरुणी त्याच्याकडे पाहते. गाडीत काही लोक आणि रस्त्यावरुन जाणाऱ्या या तरुणाचं कौतुक करताना दिसत आहे. 

हा तरुण अनेक वेळा फ्लिप करण्यात यशस्वी होतो. मात्र पुढच्या क्षणात त्याचासोबत काय होणार आहे, याची त्याला कल्पनाही नसते. हा व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता हा तरुण रस्त्याच्या कडेला जाऊन उभा राहतो. तिथे एक कार उभी असते. त्या कार जवळून तो फ्लिप करणार तोच समोरुन एक कार येते आणि तो त्या कारला जाऊन धडकतो आणि रस्त्यावर दुसऱ्या कार खाली येता येता वाचतो. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी या तरुणाने आपल्या जीव धोक्यात घातला. जर वेळीच त्या कारने ब्रेक नसता लावला तर एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं असतं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता थोडक्यात या तरुणाचा जीव वाचला आहे. मात्र त्याच्या चेहऱ्याला जोरदार मार लागल्याचं दिसतं आहे. 

Instant Karma वर व्हिडीओ

हा व्हिडीओ Instant Karmaया ट्वीचर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 5 लाख 55 हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर 14 हजार यूजर्सने हा व्हिडीओ लाइक केला आहे. सोशल मीडियावर फक्त प्रसिद्धीसाठी आपल्या जीव धोक्यात घालू नका आणि असे धोकादायक स्टंट करणे टाळा.