Viral Video : ब्रिटनचे पंतप्रधान Rishi Sunak आणि पत्नी अक्षता मूर्ती यांना पोलिसांनी का फटकारलं?

Rishi Sunak Viral Video : सोशल मीडियावर भारतीय वंशाचे आणि ब्रिटनचे पंतप्रधान  ऋषी सुनक आणि पत्नी अक्षता मूर्ती यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. खुद्द पंतप्रधानांनी नियमाचं उल्लंघन केल्यामुळे त्यांना पोलिसांनी फटकारलं आहे. काय झालं नेमकं जाणून घ्या. 

Updated: Mar 16, 2023, 08:14 AM IST
Viral Video : ब्रिटनचे पंतप्रधान Rishi Sunak आणि पत्नी अक्षता मूर्ती यांना पोलिसांनी का फटकारलं?  title=
trending video britain pm Rishi Sunak Wife Akshata Murty walking his dog without belt broke rule police reprimanded video viral on Social media

Rishi Sunak Viral Video : भारतीय वंशाचे आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (britain pm Rishi Sunak ) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.  पत्नी अक्षता मूर्ती (Akshata Murty) यांच्यासोबत बागेत फिरत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (video viral on Social media ) झाला आहे. यावेळी पोलिसांनी त्यांना नियमाची आठवण करु दिली. 

तसं तर ऋषी सुनक यांनी आजपर्यंत अनेक नियम मोडले आहेत. सगळ्या आधी लॉकडाऊनमध्ये त्यांनी कायदा मोडला होता. त्यानंतर कारची सीट बेल्ट न लावल्यामुळे त्यांना दंड ठोठावण्यात आला होता. आता बागेत फिरत असताना त्यांनी पुन्हा एकदा नियमाचं उल्लंघन केलं. (trending video britain pm Rishi Sunak  Wife Akshata Murty walking his dog without belt broke rule police reprimanded video viral on Social media )

काय घडलं नेमकं?

झालं असं की, बिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे त्यांच्या कुटुंबासोबत लंडनमधील हायड पार्कमध्ये फिरताना दिसतं आहेत. त्यांच्यासोबत दोन वर्षांचा 'लॅब्राडोर रिट्रीव्हर' जातीच्या कुत्र्यासोबत 'द सर्पेन्टाइन' तलावाच्या काठावर फिरताना दिसत आहे.  खरं तर सार्वजनिक ठिकाणी श्वानाला साखळी घालून फिरवणे बंधन कारक आहे. त्यामुळे ऋषी सुनक यांनी नियमाचं उल्लंघन केलं. 

ही बाब लक्षात येतात पोलिसांनी ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांना नियमाची आठवण करुन दिली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये नंतर तुम्ही पाहू शकता. पोलिसांनी सांगितल्यावर श्वानाला साखळी बांधण्यात आली.

हा व्हिडीओ TikTok वर पोस्ट करण्यात आला आहे. आता तो सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतो आहे. ट्वीटरवर Politics UK या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 

मेट्रोपॉलिटन पोलीस दलाने सांगितलं की."त्यावेळी उपस्थित असलेल्या एका अधिकारी एका महिलेशी बोलले. त्या अक्षता मूर्ती होत्या. त्यांना नियमांची आठवण करून दिली," असं ते म्हणाले.