अरे बापरे! हजार फूट उंचावर गेल्यावर रोलर कोस्टर थांबलं, लोक हवेत लटकले अन् मग पुढे... Video Viral

Viral Video : अनेकांना साहसी आणि खतरनाक, अॅडवेंचर खेळाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण रोलर कोस्टरचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jul 31, 2023, 12:10 PM IST
अरे बापरे! हजार फूट उंचावर गेल्यावर रोलर कोस्टर थांबलं, लोक हवेत लटकले अन् मग पुढे... Video Viral  title=
trending video roller coaster stuck on middle high in sky uk essex accident video viral social media google today news

Shocking Video : साहसी खेळ आणि भीतीदायक अशा राइड्सची मजा घेण्यासाठी असंख्य लोकांना आनंद आणि मजा येते.  कधी डोकं खाली तर पाय वर तर कधी उजवीकडून डावीकडून हजारो फूट उंचीवर गेल्यावर श्वास रोखला जातो आणि त्यानंतर ज्या गतीने तो खाली येतो...हा अनुभव घेणं फारच रोमांचक असतो. भल्या भल्या लोकांना याची भीती वाटते. पण असंख्य लोकांना असे साहसी, धोकादायक राइड्सची मजा घेयला खूप आवडतं. असाच एका धक्कादायक रोलर कोस्टरचा भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. (trending video roller coaster stuck on middle high in sky uk essex accident video viral social media google today news)

हजारो फूट उंचावर गेल्यावर...

खरं तर काहीतरी तुफान करते है असं म्हणत अंगावर काटा उभा राहिल असं काहीतरी धाडसी खेळ खेळायला लोक या जगात कमी नाहीत. त्यामुळे अनेक मोठ्या शहारांमध्ये अशा खतरनाक राइड्स असलेले मोठे मोठे अॅडवेंचर पार्क आहेत. श्वास रोखून धरणाऱ्या हे अनुभव कधी कधी जीवावर बेतात. 

मोठ्या आणि प्रसिद्ध अॅडवेंचर पार्कमध्ये राइड्सचे भयानक अपघाताचे अनेक घटना समोर आल्या आहेत. पुन्हा एकदा अशीच अंगावर काटा आणणारी घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यूकेतील साऊथटेंड थीम पार्कमध्ये रोलर कोस्टरवर रोमंचक अनुभव घेताना हजारो फूट उंचावर गेल्यावर तो तुटला अन् मग...

एका क्षणात सर्वांचे श्वास थांबले... राइड वाकडी झाली, वरचा भाग खाली आणि खालचा भाग वरती...लोक हवेत लटकली होती...पुढच्या क्षणी काय होणार या भीतीने ते लोक एकमेकांसोबत हजारो फूट उंचावर लटकली होती. त्या लोकांना वाचविण्यासाठी धावपळ सुरु झाली अग्निशमन दलाला बोलवण्यात आले. 

@SuppWarehouseUK ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओने अंगावर काटा येतो. या राइडमध्ये एक लहान मुलं देखील होतं. 40 मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर त्या लोकांना सुखरुप खाली उतरवण्यात आले. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. साहसी खेळाचा आनंद घेणं या लोकांच्या जीवावर बेतलं असतं. अॅडवेंचर पार्कमधील राइड्सच्या सुरक्षेबाबत या व्हिडीओनंतर नेटकऱ्यांनी प्रश्न निर्माण केला आहे.