विरोध झुगारून ट्रम्पची घोषणा; जेरूसलेम इस्रायलची राजधानी!

आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ. अनेकांनी ही धोक्याची घंटा असल्याचे म्हटले आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 7, 2017, 09:03 AM IST
विरोध झुगारून ट्रम्पची घोषणा; जेरूसलेम इस्रायलची राजधानी! title=

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिली आहे. अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील अनेक दशकांची आंतरराष्ट्रीय संबंधांची निती तोडून ही घोषणा केली. ट्रम्प आणि पर्यायाने अमेरिकेच्या या भूमिकेमुळे इस्रायल भलताच खूष झाला आहे. पण, आंतरराष्ट्रीय राजकारणात मात्र भलतीच खळबळ उडाली आहे. अनेकांनी ही धोक्याची घंटा असल्याचे म्हटले आहे.

शांततेसाठी उचलले पाऊल

दरम्यान, या निर्णयाबद्धल बोलतान डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, आम्ही हे पाऊल केवळ शांततेच्या कारणास्तवच उचलले आहे. जे अनेक वर्षांपूर्वीच उचलायला हवे होते. व्हाईट हाऊसला संबोधीत करताना ट्रम्प यांनी म्हटले की, आता जेरूसलेमला इस्राईलची राजधानी म्हणून घोषीत करण्याची वेळ आली आहे. इस्रायलचा पॉलेस्टाईनसोबत वाद जरूर आहे. पण, जेरूसलेमवर इस्रायलचाच अधिकार आहे. हे वास्तवाला धरूनच आहे. यात कोणतेही दुमत नाही, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे दूतावास तेल अवीवहून जेरूसलेमला हालणार

ट्रम्प यांनी आपल्या सरकारला निर्देश दिले की, इस्राईलमधील अमेरिकेचे दूतावास जे सध्या तेल अवीव येथे आहे. ते नवी राजधानी जेरूसलेमला हालविण्यात यावे. दरम्यान, अधिकाऱ्यांचे म्हणने असे की, सरकारने हे निर्देश दिले असले तरी, ही प्रक्रिया पूर्ण व्हायला किमान एक वर्षांचा कालावधी लागेल.

टम्पच्या घोषणेला अरब राष्ट्रांचा विरोध

दरम्यान, ट्रम्प यांनी ही घोषणा केली खरी. मात्र, या घोषणेमुळे अरब राष्ट्रांमध्ये तीव्र नाराजी असून, या राष्ट्रांनी अमेरिकेच्या धोरणाला विरोध केला आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचे पडसात पॅलिस्टाईनमध्ये लगेचच उमटले. गाझामध्ये पॉलिस्टीनी निदर्शकांनी अमेरिका आणि इस्राईलचे झेंडे जाळले. योरोप आणि अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांमध्येही या निर्णयाबद्धल प्रश्नचिन्ह आहे.